शहरं
Join us  
Trending Stories
1
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
2
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
3
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
4
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
5
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
6
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
7
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
8
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
9
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
10
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
11
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
12
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
13
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
14
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
15
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
16
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
17
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
18
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
19
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
20
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
Daily Top 2Weekly Top 5

धडक सिंचन विहिरींच्या कामांना मिळणार गती!

By admin | Updated: February 17, 2016 02:10 IST

बैठकीत सकारात्मक चर्चा; अभियंत्यांवरील गंडांतर टळले!

वाशिम: धडक सिंचन आणि नरेगा अंतर्गत मंजूर योजनेतून रखडलेल्या विहिरींची कामे वेळेत पूर्ण करण्यासंदर्भात १६ फेब्रुवारीला जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. त्यामुळे या कामांना गती मिळणार आहे. विशेष बाब म्हणजे काही दिवसांपूर्वी अभियंत्यांवर आलेले फौजदारी कारवाईचे गंडांतरही टळल्याची माहिती सूत्रांनी दिली. धडक सिंचन आणि नरेगांतर्गत मंजूर योजनेतील विहिरींचे १00 टक्के उद्दिष्ट पूर्ण करा; अन्यथा भारतीय दंड संहिता कलम १८८ अन्वये फौजदारी कारवाई करू, असा इशारा जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिला होता. त्याविरोधात जलसंपदा विभागातील अभियंत्यांनी ह्यएल्गारह्ण पुकारून कारवाई टाळण्यासाठी सक्तीच्या रजेवर जाण्याचा निर्धार केला होता. दरम्यान, यासंदर्भात ह्यलोकमतह्णने १0 फेब्रुवारीच्या अंकात ह्यफौजदारी कारवाईच्या धास्तीने सक्तीच्या रजेचा पवित्राह्ण या मथळ्याखाली सविस्तर वृत्त प्रकाशित केले होते. त्या पृष्ठभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी जिल्ह्यातील सर्व प्रमुख अधिकार्‍यांची बैठक बोलाविण्यात आली. बैठकीस जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्यासह जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता अजय कोहिरकर, कार्यकारी अभियंता जयंत शिंदे, शिवाजी जाधव, जिल्हा परिषदेच्या लघुसिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता, बांधकाम विभागाचे अभियंता, जिल्ह्यातील सर्व तहसीलदार, गटविकास अधिकार्‍यांची उपस्थिती होती. बैठक वादळी ठरण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती; मात्र अत्यंत शांततापूर्ण वातावरणात धडक सिंचन आणि नरेगा अंतर्गत मंजूर विहिरींची कामे सर्वांंच्या सहकार्याने पूर्ण करण्यासंबंधी सर्वंंकष चर्चा होऊन विहिरींची कामे गतीने मार्गी लावण्याचे आवाहन जिल्हाधिकार्‍यांनी यावेळी केले. ते म्हणाले की, धडक सिंचन विहीर योजनेतील रखडलेल्या तथा सुरूच न झालेल्या विहिरींची कामे वेळेत पूर्ण करण्याचे शासनाचे सक्त निर्देश आहेत. त्यामुळे या कामी प्रशासकीय यंत्रणेतील अधिकारी, कर्मचार्‍यांनी सहकार्य करावे. यासाठी जिल्हा प्रशासनाचे सर्वतोपरी सहकार्य असेल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.