नंदकिशोर नारे / वाशिमजिल्ह्यातील शेतकर्यांवर संकटाची मालिका सुरूच असल्याने शेतकरी मेटाकुटीस आला आहे. पेरणीसाठी आवश्यक असलेल्या बियाण्यांपासून तर पीक हाती येईपर्यंत यावर्षी शे तकर्यांना संकटाचा सामना करावा लागला. आता अनेक शेतकर्यांनी नुकतीच सोयाबीनची काढणी केली यामध्ये सोयाबीनचा उतारा खर्चही निघणारा नसल्याने शेतकर्यांचे नियोजन कोलमडले आहे. एकरी ९ हजार रुपये खर्च व ६ हजार रुपये उत्पन्नामुळे वर्ष कसे काढावे, असा प्रश्न शेतकर्यांसमोर ठाकला आहे. सोयाबीनने यावर्षी घात केल्याच्या प्रतिक्रिया शे तकरी व्यक्त करीत आहेत.खरीप हंगामात जिल्ह्यात पेरणीयोग्य साडेचार लाख हेक्टर क्षेत्रापैकी २ लाख ८८ हजार हे क्टरवर सोयाबीनची पेरणी झाली. अध्र्याअधिक क्षेत्रावर सोयाबीनचा पेरा, तर उर्वरित क्षेत्रात कपाशी, तूर, यासह मूग, उडीद, ज्वारी, बाजरी, मका, सूर्यफूल आदी पिकांची शेतकर्यांनी पावसाचा अंदाज घेऊन पेरणी केली होती. मूग, उडिदाचे पीक फार थोड्या प्रमाणात असले तरी या पिकालाही मध्यान्हात पावसाने मारलेल्या दडीचा दणका बसला. आधीच उशिराने झालेली पेरणी, विविध प्रकारच्या किडीतून पिकांना कसेबसे सावरणार्या जिल्हाभरातील शे तकर्याला सोयाबीन या मुख्य पिकासह इतर पीक वाचण्यासाठी प्रयत्न केले. त्यात काही शे तकरी यशस्वीही झाले; परंतु ज्यावेळी सोयाबीन काढणीची वेळ आली, तेव्हा मात्र जिल्हय़ा तील शेतकर्यांच्या हातात निराशा आली. जिल्हय़ातील कोरडवाहू जमिनीत तर काही ठिकाणी एकरी ७0 किलो सोयाबीनचा उतारा झाला. सोयाबीनचा खर्च व उत्पन्न याबाबत जिल्हय़ातील प्रत्येक तालुक्याची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता संपूर्ण जिल्हय़ात उत्पन्न कमी असल्याचे दिसून आले. कारंजा तालुक्यामध्ये सोयाबीनचा पेरा जवळपास ६0 टक्के, तर कापूस २५ टक्के व इतर पिके १0 ते १५ टक्के शेतकर्यांनी घेतली. या तालुक्यात सोयाबीनचा पेरा एकरी ३ पोते कमीत-कमी झाला. काहीच शेतकर्यांना ४ ते ५ पोत्याचा उतारा झाला. मंगरूळपीर तालुक्यात सोयाबीनचा पेरा जवळपास ७५ टक्के आहे. येथेही परिस्थिती मात्र वेगळी नाही. ज्या शेतकर्यांकडे पाण्याची व्यवस्था होती त्यांच्याकडे एकरी ४ ते ५ चा उतारा आहे. कोरडवाहू शेतकर्यांचे मात्र मरणच असल्याचे चित्र आहे. एकरी १ पोत्यापासून तर ३ पोत्यापर्यंत उत्पन्न शेतकर्यांना झाल्याचे शेतकर्यांनी सांगितले.रिसोड तालुक्यामध्ये सर्वाधिक पेरा सोयाबीनचा आहे. ९0 टक्क्याच्या जवळपास शे तकर्यांनी यावर्षी सोयाबीनचा पेरा केला. त्याचे संगोपन केले. विविध संकटांना सामोरे जाऊन कसेबसे पीक वाचविले; परंतु ज्यावेळी काढणीची वेळ आली तेव्हा एकरी नगण्य पीक आल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.
सोयाबीनने केला घात
By admin | Updated: October 26, 2014 00:38 IST