शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

अल्प पावसावरच पेरणीला प्रारंभ

By admin | Updated: June 20, 2016 02:09 IST

मालेगाव, वाशिम व रिसोड तालुक्याला दमदार पावसाची प्रतीक्षा.

वाशिम: मृग नक्षत्राच्या सुरुवातीला दांडी मारणार्‍या पावसाने शुक्रवारपासून कमी-अधिक प्रमाणात जिल्हय़ात हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला. पुरेशा प्रमाणात पाऊस झालेला नसतानाही शेतकर्‍यांनी पेरणीला सुरुवात केल्याचे दिसून येते. दुबार पेरणी टाळण्यासाठी समाधानकारक पावसानंतरच पेरणी करण्याचा सल्ला कृषी विभागाने दिला. गत काही वर्षांंपासून निसर्गाची साथ मिळत नसल्याने, बळीराजाला विविध संकटांचा सामना करण्याची वेळ आली आहे. यावर्षी समाधानकारक पाऊस राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. मृग नक्षत्राला सुरुवात झाल्यानंतर, मानोरा तालुक्याचा अपवाद वगळता अन्य तालुक्यात पावसाने दडी मारली. ११ जून रोजी कमी-अधिक प्रमाणात जिल्हय़ात सर्वत्र पाऊस झाला. १७ जूनपासून जिल्हय़ात ढगाळ वातावरण आणि कमी-अधिक प्रमाणात पाऊस पडत असल्याने मंगरुळपीर, मानोरा व कारंजा तालुक्यात शेतकर्‍यांनी पेरणीला सुरुवात केल्याचे चित्र आहे. दुबार पेरणीचा धोका टाळण्यासाठी, मान्सूनचा ७५ मिमी पाऊस झाल्यावर किंवा जमिनीत १४ ते १५ सेंमी खोलपर्यंंत ओलावा असेल तर पेरणी करणे अधिक फायदेशीर आहे, असा सल्ला कृषी विभागाने दिलेला आहे. जिल्ह्यात एकूण ५ लाख १३ हजार हेक्टर क्षेत्रांपैकी यावर्षी ४.३0 लाख हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणी होण्याचा अंदाज कृषी विभागाने बांधला आहे. मानोरा तालुक्याचा अपवाद वगळता उर्वरित तालुक्यात पावसाने अपेक्षित सरासरी गाठली नाही. रविवारी सायंकाळच्या सुमारास मानोरा, हातना, फुलउमरी व कारखेडा परिसरात जोरदार पाऊस झाला.