शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

शासनाच्या नियमाला समाजकल्याण कार्यालयाची बगल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2017 22:48 IST

नंदकिशोर नारे।लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी टॅ्रक्टर व त्याच्या उपसाधनांचा समाजकल्याण विभागाच्यावतिने पुरवठा करण्यात येतो. यामध्ये शासनाच्यावतिने काही ठराविक कंपन्या ठरवून दिल्या आहेत. त्यापैकी बचत गटांनी एका ट्रॅक्टरची पंसती दर्शविल्यानंतर तो समाजकल्याण विभागाच्यावतिने पास करण्यात येतो, परंतु वाशिम येथे समाजकल्याण विभागाच्यावतिने पास ...

ठळक मुद्देबचत गटांना यादीत नसलेले ट्रॅक्टर ३८ ट्रॅक्टरपैकी २१ ट्रँक्टरचा समावेश

नंदकिशोर नारे।लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी टॅ्रक्टर व त्याच्या उपसाधनांचा समाजकल्याण विभागाच्यावतिने पुरवठा करण्यात येतो. यामध्ये शासनाच्यावतिने काही ठराविक कंपन्या ठरवून दिल्या आहेत. त्यापैकी बचत गटांनी एका ट्रॅक्टरची पंसती दर्शविल्यानंतर तो समाजकल्याण विभागाच्यावतिने पास करण्यात येतो, परंतु वाशिम येथे समाजकल्याण विभागाच्यावतिने पास करण्यात आलेल्या ट्रॅकटर कंपनीमध्ये त्या कंपनीचा यादीतच समावेश नाही अशा कंपनीला सर्वाधिक ट्रॅक्टर व उपसाधने देण्याचा पराक्रम केला आहे.अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांच्या आर्थिक प्रगतीसाठी तथा बचत गटातील सदस्यांना रोजगार प्राप्त करुन त्यांची आर्थीक परिस्थिती सुधारावी यासाठी सामाजिक न्याय विभाग राज्यभरात मिनी ट्रॅक्टर्सचे वितरण करतेये. यासाठी सरकार ९० टक्के अनुदान तर केवळ १० टक्के वाटा बचत गटांना असतो. वाशिम जिल्हयात यानुसार २०१३ मध्ये १६, २०१४ मध्ये २०, २०१५ मध्ये ४२ व २०१६ मध्ये २३ असे एकूण १०१ ट्रॅक्टर व उपसाधने देण्यात आले आहे. २०१७ या वर्षासाठी ३८ ट्रॅक्टर व उपसाधने दिल्या जाणार आहेत. यासाठी शासनाच्यावतिने सोनालीका, मिसिगुसी, महिंद्रा युवराज २०१५ व कॅप्टन या कंपनीच्या ट्रॅक्टर बचत गटांना देण्याचे ठरविले आहे. असे असतांना वाशिम जिल्हयामध्ये २०१७ मध्ये ज्या बचतगटांना ट्रॅक्टर दिले जाणार आहेत त्यामध्ये शासनाच्या यादीत असलेल्या मिसीगुसी कंपनीला १० व महिंद्रा कंपनीला ३ असे एकूण १३ ट्रॅक्टर देण्याचे निश्चित केले आहे. तर शासनाच्या यादीतच नसलेल्या एका कंपनीला २१ ट्रॅक्टर देण्याचे ठरले आहे, तर चार ट्रॅक्टर अद्याप कोणत्याच कंपनीला देण्यात आले नाहीत. शासन यादीत असलेल्या केवळ दोन कंपनींना वगळता सोनालीका व कॅप्टन या कंपनीचा एकही ट्रॅक्टर बचत गटांना देण्यात आले नसून यादीत नसलेल्या कंपनीला २१ ट्रॅक्टर देण्याचा पराक्रम समाजकल्याण विभागाच्यावतिने केला आहे. चार अर्ज सद्या पेंडिग असल्याने अद्याप चार ट्रॅक्टर कोण्याच कंपनीकडे देण्यात आले नाहीत.या योजनेंतर्गत बचत गटांना समाज कल्याण विभागाकडे अर्ज करावा लागतो. अर्ज केल्यानंतर तो पास झाल्यावर यादीत असलेल्या ट्रॅक्टरची निवड बचत गटांना करावी लागते. यामध्ये बचत गटातील सदस्य होवू शकते एकाच कंपनीचे ट्रॅक्टर घेण्याचे ठरवू शकते, परंतु शासनाने ठरवून दिलेल्या यादीत नसलेल्या ट्रॅक्टरची निवड कशी झाली याबाबत प्रश्न निर्माण होत आहे. याकडे समाजकल्याण विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांनी लक्ष देणे गरजेचे झाले आहे.बचत गटांना पहिला हप्ता प्राप्तयादीत नसलेल्या कंपनीने २१ बचत गटांची बिले समाजकल्याण विभागाकडे जमा केली आहे. यावरुन समाजकल्याण विभागाने बचत गटाच्या खात्यांमध्ये पहिला हप्ता सुध्दा ट्रॉन्सर्फर केला असून दुसरा हप्ता वाहन पासिंगनंतर केल्या जाणार आहे.----------------------------------------अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी टॅ्रक्टर व उपसाधनांचा पुरवठा जो करण्यात येतो तो बचत गटांना आवडेल त्या कंपनीचा घेवू शकतो. शासनाने चार कंपन्यांची यादी दिली आहे हे बरोबर आहे, याबाबत आम्हालाही शंका होती तेव्हा आम्ही वरिष्ठांशी संपर्क केला होता. वरिष्ठांच्या सुचनेनुसारच कार्यवाही करण्यात आली.- माया केदारसमाज कल्याण सहाय्यक आयुक्त