शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
4
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
5
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
6
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
7
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
8
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
9
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
10
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
11
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
12
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
13
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
14
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
15
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
16
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
17
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
18
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
19
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
20
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
Daily Top 2Weekly Top 5

सहा लघुसिंचन प्रकल्पांना तांत्रिक मान्यतेची प्रतीक्षा!

By admin | Updated: February 20, 2016 02:20 IST

वाशिम तालुक्यातील शेलू एक व शेलू दोन, उमराळा कोल्ही तांडा आणि सोनगव्हाण लघुसिंचन प्रकल्पांचा समावेश.

वाशिम : शेतकर्‍यांचे हिरवे स्वप्न साकारण्यासाठी जिल्हा परिषदेच्या लघुसिंचन विभागाने सहा प्रकल्पांच्या प्रस्तावांचे प्रशासकीय सोपस्कार पूर्ण करून तांत्रिक मान्यतेसाठी पाटबंधारे विभागाकडे सुपूर्द केले आहेत. पाटबंधारे विभागाची तांत्रिक मान्यता कधी मिळते, याकडे शेतकर्‍यांचे लक्ष लागले आहे.गत काही वर्षांपासून पावसात अनियमितता असल्याने शेतकर्‍यांना अपेक्षित उत्पादन घेण्यात अडचणी येत आहेत. कोरडवाहू शेतकर्‍यांचा तर काही वेळेस लागवड खर्चही वसूल होत नाही. पाण्याची सुविधा नसल्याने रब्बी हंगामात पीक घेता येत नाही. शेतीत अपेक्षित उत्पादन घेण्यासाठी अनेक शेतकरी सिंचनाची सुविधा उपलब्ध करीत आहेत. पाटबंधारे व जलसंपदा विभागदेखील सिंचन प्रकल्पाची सुविधा निर्माण करीत आहे. तसेच जिल्हा परिषदेचा लघू सिंचन विभागही लघुसिंचन प्रकल्पांद्वारे शेतकर्‍यांना पाणी उपलब्ध करून देत आहे. जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेने ९ डिसेंबर २0१५ रोजी मालेगाव तालुक्यातील उमरदरी, रिसोड तालुक्यातील येवता, वाशिम तालुक्यातील शेलू एक व शेलू दोन, उमराळा कोल्ही तांडा आणि सोनगव्हाण अशा सहा लघुसिंचन प्रकल्पांना प्रशासकीय मान्यता प्रदान केली होती. त्यानंतर लघुसिंचन विभागाने प्रशासकीय सोपस्कार पार पाडून पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता धनशेट्टी यांच्याकडे तांत्रिक मान्यतेसाठी प्रस्ताव सादर केला. धनशेट्टी यांच्या मान्यतेनंतर सहा लघुसिंचन प्रकल्पाच्या पुढील कार्यवाहीला वेग येणार आहे. सध्या तांत्रिक मान्यतेची प्रतीक्षा आहे.