वाशिम : येथील नालंदा नगर परिसरातील एका घरामध्ये एका पोलिस शिपायासह सहा इसमांना जुगार खेळताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रंगेहात पकडले. ही घटना १२ मे रोजी रात्री ११:३0 वाजताचे सुमारास घडली असुन जुगार्यांकडून रोख २५ हजार ७00 रूपये जप्त करण्यात आले. शहरातील नालंदा नगर परिसरात जिल्हा स्त्री रूग्णालयाचे बांधकाम सुरू आहे. या बांधकामसमोर अर्धवट स्थितीमध्ये बांधलेली काही घरे आहेत. या घरामध्ये जुगार सुरू असल्याची गुप्त माहिती अप्पर पोलिस अधिक्षक तुषार पाटील यांना मिळाली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्या घरावर छापा टाकु न एका पोलीसासह सहा जणांना अटक करण्यात आली व त्यांच्याकडू न रोख २५ हजार ७00 रूपये व १६00 रूपयाचे जुगार साहित्य असा एकुण २७ हजार ३00 रूपयाचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. या सहा जणांविरूध्द वाशिम शहर पोलिस स्टेशनमध्ये मुंबई जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहीती पोलीस सुत्रांनी दिली आहे.
जुगार खेळणार्या पोलिसासह सहा अटक
By admin | Updated: May 14, 2014 00:29 IST