शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

रात्री दहा वाजेपर्यंत दुकाने सुरू राहणार; अर्थचक्राला आणखी गती मिळणार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:47 IST

संतोष वानखडे वाशिम : ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत १५ ऑगस्टपासून नवीन नियमावली लागू होणार असून, त्यानुसार रात्री १० वाजेपर्यंत ...

संतोष वानखडे

वाशिम : ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत १५ ऑगस्टपासून नवीन नियमावली लागू होणार असून, त्यानुसार रात्री १० वाजेपर्यंत दुकाने, मॉल, उपाहारगृहे सुरू ठेवता येणार आहेत. निर्बंध बऱ्याच अंशी शिथिल होत असल्याने अर्थचक्राला आणखी गती मिळण्याचा अंदाज व्यापाऱ्यांमधून वर्तविला जात आहे.

कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत कठोर निर्बंध लागू असल्याने उद्योगचक्र जवळपास ठप्पच होते. अत्यावश्यक सेवा वगळता उर्वरित सराफा, वाहन, कापड, इलेक्ट्रॉनिक्स, मोबाईल, फर्निचर यासह अन्य व्यवसायांना जबर फटका बसला. कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर निर्बंध हळूहळू शिथिल होत आहेत. सध्या रात्री ८ वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्यास मुभा आहे. कोरोना नियंत्रणात असल्याने राज्य शासनाने १५ ऑगस्टपासून निर्बंध आणखी शिथिल करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार जिल्ह्यातील दुकाने, मॉल, उपाहारगृहे १५ ऑगस्टपासून रात्री १० वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास मुभा राहणार आहे. त्यामुळे उद्योग जगताला उभारी मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या असून, अर्थचक्राला आणखी गती मिळेल, असा अंदाज व्यापाऱ्यांमधून वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, खबरदारीचा प्रयत्न म्हणून सर्व दुकाने, कार्यालये, औद्योगिक आस्थापना, उपाहारगृहे, बार व मॉल मालक/ व्यवस्थापनाला सर्व कर्मचारी, कामगारांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतल्याची माहिती ठेवावी लागणार आहे.

०००००००००००००००

बॉक्स

लग्न समारंभावरील उपस्थिती मर्यादेत सूट !

खुल्या प्रांगणातील /लॉनवरील किंवा बंदिस्त मंगल कार्यालयातील विवाह सोहळे संबंधित प्रांगण, लॉन, मंगल कार्यालयातील आसन व्यवस्थेच्या ५० टक्के क्षमतेने सुरू ठेवण्याची मुभा देण्यात येणार आहे. तसेच खुल्या प्रांगण, लॉनमध्ये होणाऱ्या विवाह सोहळ्यास उपस्थितांची संख्या प्रांगण किंवा लॉन क्षमतेच्या ५० टक्के, परंतु जास्तीत जास्त २०० व्यक्ती या मर्यादेत राहील. बंदिस्त मंगल कार्यालय, हॉटेलमध्ये उपस्थितांची संख्या क्षमतेच्या ५० टक्के, परंतु जास्तीत जास्त १०० व्यक्ती या मर्यादेत राहील.

००००००००००००००

व्यापारी म्हणतात, उद्योगाला उभारी मिळेल !

कोट

दुसरी लाट ओसरल्याने १५ ऑगस्टपासून दुकाने रात्री १० वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास मुभा मिळणार आहे. त्यामुळे उद्योग क्षेत्राला उभारी मिळेल, यात शंका नाही. व्यापारी, नागरिकांनीदेखील कोरोनाचा प्रसार होणार नाही, याची दक्षता घ्यावी.

- आनंद चरखा

जिल्हाध्यक्ष, युवा व्यापारी मंडळ.

००००००००

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कडक निर्बंधामुळे ऐन लग्नसराईच्या हंगामात कापड दुकाने बंद असल्याने या व्यवसायाला जबर फटका बसला. आता निर्बंध शिथिल होत असल्याने कापड व्यवसाय सावरेल, यात शंका नाही.

- शंकरलाल पारिजात,

कापड व्यावसायिक, वाशिम

०००००

ऐन लग्नसराईत मंगल कार्यालये जवळपास बंदच होती. त्यामुळे या व्यवसायाला आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले. मंगल कार्यालयातील उपस्थिती मर्यादेत सूट मिळाल्याने तसेच निर्बंध आणखी शिथिल झाल्याचे स्वागतच आहे.

- शिवाजी वाटाणे,

संचालक, मंगल कार्यालय, वाशिम

००००००

१५ ऑगस्टपासून निर्बंधात आणखी सूट मिळणार असल्याने हॉटेल व्यवसायाला निश्चितच चांगले दिवस येतील. हॉटेलमधून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढणार नाही, याची दक्षता व्यावसायिकांकडून घेतली जाईल.

- पंकज गीते

हॉटेल व्यावसायिक, वाशिम