शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

महात्मा बसवेश्वर चौकाच्या सौंदर्यीकरणासाठी शिवा संघटना आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:46 IST

बसवेश्वर चौकाच्या प्रलंबित सौंदर्यीकरणासंदर्भात चर्चा करण्यासाठी १२ ऑगस्ट रोजी स्थानिक संकटमोचन हनुमान मंदिरात शिवा संघटनेची तातडीची सभा घेण्यात आली. ...

बसवेश्वर चौकाच्या प्रलंबित सौंदर्यीकरणासंदर्भात चर्चा करण्यासाठी १२ ऑगस्ट रोजी स्थानिक संकटमोचन हनुमान मंदिरात शिवा संघटनेची तातडीची सभा घेण्यात आली. या सभेला शिवा संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष दिलीपआप्पा काष्टे, विद्यमान जिल्हाध्यक्ष संजयआप्पा काष्टे, शिवा कर्मचारी जिल्हाध्यक्ष राजकुमारआप्पा बोनकिले, जिल्हा सरचिटणीस मनिषआप्पा मखमले, जिल्हा उपाध्यक्ष गोपालआप्पा महाजन, ज्येष्ठ मार्गदर्शक किशोरआप्पा पेंढारकर, चंद्रकांतआप्पा खेलुरकर, नंदकिशोरआप्पा देशमुख, अशोकआप्पा वनगे, श्यामआप्पा बास्टेवार, शिवा मावळे, कैलासआप्पा संगेवार, महादेवआप्पा संगेवर, विशालआप्पा कोष्टी आदी पदाधिकारी उपस्थित होते. हे काम लवकरात लवकर सुरू व्हावे यासाठी शिवा संघटना व समाजबांधवांच्या सहभागातून जिल्हाधिकारी तथा मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देण्याबाबत निर्णय घेण्यात आला.

-----------

निधी उपलब्ध होऊनही काम थांबले

महात्मा बसवेश्वर चौकाच्या सौंदर्यीकरणाचा मुद्दा शिवा संघटनेने सातत्याने उचलून धरल्यानंतर व या कामाच्या निधी उपलब्धतेसाठी खासदार भावना गवळी यांना निवेदन दिल्यानंतर भावना गवळी यांनी या कामासाठी निधी उपलब्ध करून दिला होता. या कामाच्या निविदेची सर्व कार्यवाही पूर्ण झाल्यानंतरही गेल्या अनेक महिन्यांपासून काम सुरू न झाल्याने शिवा संघटना तसेच समाजबांधवांमध्ये रोष व्यक्त केला जात आहे.