शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

शिरपूर जि.प. उर्दू शाळेच्या व्हरांड्याचा स्लॅब कोसळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:46 IST

शिरपूर येथील गुजरी चौकात जि. प.ची उर्दू मुलांची शाळा आहे. या शाळेत पहिली ते सातवीपर्यंत १६९ विद्यार्थी संख्या आहे. ...

शिरपूर येथील गुजरी चौकात जि. प.ची उर्दू मुलांची शाळा आहे. या शाळेत पहिली ते सातवीपर्यंत १६९ विद्यार्थी संख्या आहे. या शाळेत आधीच मोठ्या प्रमाणात समस्या आहेत. वर्गखोलीत भरदिवसा अंधकारमय वातावरण राहत असल्याचे पालकांचे मत आहे. तसेच पावसाळ्यात शाळेच्या प्रांगणात मोठ्या प्रमाणात पाणी साचते. हे पाणी मुख्याध्यापकांच्या कार्यालयातही शिरते. त्यातच गुरुवार १२ ऑगस्ट रोजी या उर्दू शाळेतील वर्ग खोल्यांकडे जाणाऱ्या मार्गातील व्हरांड्याचा स्लॅब अचानक कोसळला. दरम्यान, कोरोना पार्श्वभूमीवर अद्याप शाळा सुरू करण्यात आल्या नसल्याने मोठा अनर्थ टळला. १५ व्या वित्त आयोगातून आरोग्य व शिक्षणासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होत असताना या शाळेच्या समस्या दूर होऊ शकल्या नाहीत.

------

पंचायत समिती सदस्यांनी केली पाहणी

घटनेची माहिती मिळाल्यानंतर पंचायत समिती सदस्य शकिलखा पठाण, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य तथा पालकांच्या वतीने यांनी शाळेला भेट देऊन पाहणी केली. दरम्यान, या समस्या दूर करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य तथा पालकांच्या वतीने अ.मुकीम आ.हकिम यांनी १३ ऑगस्ट रोजी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद प्रभारी अध्यक्ष तथा गटविकास अधिकारी मालेगाव यांना निवेदन दिले आहे.