शहरं
Join us  
Trending Stories
1
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
2
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
3
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
4
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
5
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
6
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
7
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
8
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
9
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
10
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
11
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
12
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
13
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
14
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
15
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
16
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
17
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
18
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
19
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
20
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
Daily Top 2Weekly Top 5

एसटीचा श्रावणात शिमगा; कर्मचाऱ्यांचा पगार लटकला !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:41 IST

दर महिन्याच्या ७ तारखेला पगार कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होत असतो. मात्र, ऑगस्ट महिन्याची १४ तारीख उलटली असतानाही एसटी कर्मचाऱ्यांचा ...

दर महिन्याच्या ७ तारखेला पगार कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होत असतो. मात्र, ऑगस्ट महिन्याची १४ तारीख उलटली असतानाही एसटी कर्मचाऱ्यांचा पगार होण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. त्यामुळे ‘महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटना’ ही मान्यताप्राप्त एसटी कर्मचारी संघटना औद्योगिक न्यायालयात दावा ठोकण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. कोरोना काळात सुरुवातीला एसटी सेवा सर्वसामान्य लोकांकरिता पूर्णपणे बंद होती. त्यामुळे एसटीला मोठा फटका बसला होता. इंधनाचे वाढते दर, कर्मचाऱ्यांबरोबर झालेले वेतनकरार, कमी होणारी प्रवासी संख्या यामुळे एसटी महामंडळाचे पेकाट पार मोडले आहे. त्यातच अनेक प्रकारच्या अनुदानांचा परतावा सरकारकडून थकला आहे. या सर्व परिस्थितीमुळे एसटी महामंडळावर कर्जाचा बोजा दिवसेंदिवस वाढत आहे.

--------

१) आकडे काय सांगतात?

आगार - कर्मचारी

वाशिम - २६७

मंगरुळ - २३८

कारंजा - २३०

रिसोड - २५७

--------------

२) उत्पन्न कमी अन् खर्च जास्त

जिल्ह्यात वाशिम, रिसोड, कारंजा आणि मंगरुळपीर हे चार आगार आहेत. चारही आगारात मिळून १८६ च्या आसपास बसगाड्या आणि एक हजारांच्या जवळपास कर्मचारी आहेत. साधारणत: प्रत्येक आगाराला सद्यस्थितीत दरदिवशी अडीच ते तीन लाख रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. तथापि, खर्चाचे प्रमाण त्यापेक्षा अधिक आहे. एखादे आगार सोडले तरी डिझेल, टायर, फिल्टर, ऑईलवर मोठ्या प्रमाणात खर्च होतो. साधारणत: दरदिवशी ३ लाखांहून अधिक खर्च येतो. त्यामुळे वेतनासाठी रक्कम शिल्लक ठेवणेच कठीण होत आहे.

-----------------------

३) उसनवारी तरी किती करायची?

१) कोट : कोरोना संसर्गाच्या काळात आधीच अडचणीत वाढ झाली आहे. त्यात एसटी महामंडळाकडून जुलै महिन्याचा पगार अद्यापही मिळाला नाही. त्यामुळे घरचा खर्च कसा चालवायचा, देणीघेणी कशी करायची, मुलांच्या शिक्षणाचा खर्च कसा करायचा, असे विविध प्रश्न उपस्थित होत आहेत.

- गोपाल झळके,

एसटी कर्मचारी

---------

कोट :

एसटी कर्मचाऱ्यांचा पगार दर महिन्याच्या ७ तारखेला होत असतो. त्यानुसारच आमच्या खर्चाचे नियोजनही असते; परंतु आता १४ ऑगस्ट उलटली तरी आमच्या पगाराचा काही पत्ता नाही. मागील महिन्यात झालेल्या खर्चाची देणीघेणी, या महिन्याचे नियोजन कसे करायचे, घराचा खर्च कसा चालवायचा, असे प्रश्न आहेत.

-विजय सावळे,

एसटी कर्मचारी,

--------------

४) नियंत्रकाचा कोट

कोट : गेल्या वर्षी दोन महिने एसटी कर्मचाऱ्यांचा पगार झाला नव्हता. राज्य सरकारने एक हजार कोटींची तत्काळ मदत केल्याने ते प्रकरण मार्गी लागले होते. तेव्हा सध्याच्या परिस्थितीत कर्मचाऱ्यांचा सरलेल्या जुलै महिन्याचा पगार कसा द्यायचा असा प्रश्न एसटी महामंडळापुढे आहे. ९० हजारपेक्षा जास्त एसटी कर्मचाऱ्यांचा पगार अजून झालेला नाही.

-मुकुंद न्हावकर,

आगार व्यवस्थापक, कारंजा.

-----------------------