शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील सातबारा पुनर्शोधनाचे काम ५० टक्के!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2017 19:58 IST

वाशिम: शासनाने सर्व दस्तऐवजांचे संगणकीकरण करण्याचे ठरविल्यानंतर शेतकºयांसाठी आवश्यक असलेल्या सात-बारा या दस्तऐवजाचेही राज्यभरात संगणकीकरण करण्यात आले. 

ठळक मुद्दे४०२ गावांचे अंतिम प्रमाणपत्र६५५ गावांतील सर्व्हे  दुरुस्ती

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: शासनाने सर्व दस्तऐवजांचे संगणकीकरण करण्याचे ठरविल्यानंतर शेतकºयांसाठी आवश्यक असलेल्या सात-बारा या दस्तऐवजाचेही राज्यभरात संगणकीकरण करण्यात आले. तथापि, या प्रक्रियेनंतरही संगणकीकृत सातबारामध्ये त्रुटी आढळून आल्यानंतर शासनाच्यावतीने सात-बारा पुनर्शोधन अर्थात सात-बारा री एडिट कार्यक्रम राबविण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या. या प्रक्रियेला जुलै महिन्यात सुरुवात झाल्यानंतर सद्यस्थितीत जिल्ह्यातील ८०९ गावांपैकी ६५५ गावांतील सर्व्हे  दुरुस्ती पूर्ण करून ४०२  गावांचे अंतिम प्रमाणपत्रांचे कामही पूर्ण करण्यात आले आहे. शासनाने संगणकीकरणावर भर दिल्यानंतर सर्वच दस्तऐवजांचे संगणकीकरण करण्यात येत आहे. या अंतर्गत शेतकºयांसाठी आवश्यक असलेल्या सात-बाराचेही संगणकीकरण करण्यात आले. शेतकºयांना अद्ययावत सातबारा मिळावा, गट क्रमांकामधील क्षेत्रांसंदर्भात असलेले आक्षेप दूर व्हावे या उद्देशाने सातबारा संगणकीकरण प्रक्रिया राज्यभरात झ्रपाट्याने पूर्ण करण्यात आली; परंतु त्यामध्येही अनेक त्रुटी आढळून आल्यानंतर शासनाने सातबार री-एडिट कार्यक्रम राबविण्यास सुरुवात केली. या अंतर्गत सुरुवातीला महसूल मंडळ स्तरावर सातबारा चावडी वाचन प्रक्रिया राबवून त्यामध्ये क्षत्र न जुळत असलेल्या गटक्रमांकासह, इतर तांत्रिक अडचणींबाबत शेतकºयांचे आक्षेप नोंदवून घेण्यात आले. ही प्रकिया १५ जुलैपूर्वीच पूर्ण करण्यात आली. त्यानंतर शेतकºयांच्या आक्षेपानुसार आणि लेखी सातबाराचे निरीक्षण करून तहसील स्तरावर दुरुस्ती करण्यात आली. त्यानंतर जिल्हास्तरावर उर्वरित दुरुस्तीचे काम करून पुन्हा सातबारा री-एडिट प्रक्रिया राबविण्यास सुरूवात करण्यात आली. मागील २५  दिवसांच्या कालावधीत वाशिम जिल्ह्यातील ८०९ गावांपैकी ६५५ गावांतील सर्व्हे  दुरुस्ती पूर्ण करून ४०२  गावांचे अंतिम प्रमाणपत्रही पूर्ण झाले आहे.