शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यात सात महिलांनी मागितली उमेदवारी

By admin | Updated: September 7, 2014 02:58 IST

कारंजा विधानसभेवर महिलांचा दावा ; वाशिम ३, कारंजा २ तर रिसोडमधून २ महिला निवडणूक लढण्याच्या तयारीत

वाशिम : जिल्हय़ात होऊ घातलेल्या तीनही विधानसभा मतदारसंघासाठी महिला इच्छुक आहे त; परंतु त्यांना पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नसल्याने वाशिम व रिसोड विधानसभा मतदारसंघा तून इच्छुक असलेल्या महिलांनी माघार घेतली. त्यांनी प्रयत्न केले; मात्र निष्फळ ठरले. कारंजा विधानसभा मतदार संघातील दोन राजकीय पक्षाच्या इच्छुक महिला उमेदवारांनी मात्र थेट मु ख्यमंत्री यांची भेट घेतली तर येथे आलेल्या पक्षनिरीक्षकांनाही निवेदन देऊन महिला उमेदवार उभे करण्याची मागणी केली आहे.सुरुवातील विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले तेव्हा तीनही विधानसभा मतदारसंघात ७ महिला निवडणूक लढविण्यास इच्छुक होत्या. यामध्ये वाशिम विधानसभा मतदारसंघातून ३, कारंजा विधानसभा मतदारसंघातून २ तर रिसोड विधानसभा मतदारसंघातून २ महिलांचा समावेश होता; मात्र यानंतर पक्षाच्यावतीने व पदाधिकार्‍यांनी पुढाकार न घेतल्याने इच्छुक महिलांची मागणी मागे पडली. काही दिवसांआधी एका वाशिम जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा तथा काँग्रेसच्या नेत्या यांनी थेट मुख्यमंत्री यांची भेट घेऊन याबाबत चर्चा केली तसेच पक्ष निरीक्षकांना भेटूनही आपले मत व्यक्त केले. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्याही एका महिला नेत्या व माजी जिल्हा परिषद अध्यक्षा यांनीसुद्धा पक्षङ्म्रेष्ठीकडे कारंजा विधानसभा म तदारसंघात महिला उमेदवार देण्याची मागणी केली होती; मात्र त्यांनी यानंतर पुढे कोणतेच पाऊल उचलले नसल्याने त्यांची मागणी केवळ मागणीच राहिली. उमेदवारी मिळो अथवा न मिळो; मात्र कारंजा विधानसभा मतदारसंघात महिलांनी उमेदवारीसाठी फिल्डिंग लावल्याने अनेक इच्छुक पुरुष उमेदवारांमध्ये खळबळ माजली आहे. तसेच प्रत्येक जिल्हय़ात किमान एका तरी महिलेला विधासभेचे तिकीट द्यावे, असा आग्रह कारंजा-मानोरा विधानसभा म तदारसंघातील काही महिलांनी मागणी केली आहे.जिल्हय़ात ८ लाख ४९ हजार जवळपास मतदार आहे. त्यात महिला ४ लाख मतदार असताना गेल्या ५0 वर्षात केवळ बोटावर मोजण्याइतपत महिलांनाच विधानसभेवर जाण्याची संधी मिळाली. महिलांना विधानसभा निवडणुकीत उमेदवारी दिल्यास त्याही विधानसभेत जाऊ, असे बोलल्या जाते.