मेडशी (जि. वाशिम): स्कॉर्पिओ व बोलेरो या वाहनांचा समोरासमोर अपघात होऊन सात जण जखमी झाले. ही घटना ६ जानेवारीला सकाळी ९ वाजताच्या सुमारास मेडशीपासून २ किमी अंतरावर असलेल्या एका खासगी पाइप फॅक्ट्रीजवळ घडली. अकोला येथील शाहा कुटुंब शिरपूर येथे दर्शन आटोपून अकोल्यासाठी एमएच ३0 पी ३८८0 क्रमांकाच्या स्कॉर्पिओ वाहनाने जात असताना, अकोलाकडून येणार्या एमएच ३0 ए बी ३0८९ क्रमांकाच्या बोलोरो पिक अप वाहनाने विरूद्ध दिशेने जबर धडक दिली. धडक एवढी जबरदस्त होती की, दोन्ही वाहने जवळच असलेल्या पुलामध्ये १५ फूट खोल पडलीत. यामध्ये स्कॉर्पिओ गाडीचा चकनाचूर झाला. गाडीमध्ये असलेले अशोक बुरसे (वय ५0), कुसलाल (वय५0), अतुल शाहा (वय ४0), कैल्पेश शाह (वय ३0), गुंजन कोरडीया (वय २४), हे जखमी झाले असून, गुंजन कोरडीया या गंभीर जखमी झाल्या. बोलरो पिक अपमधील अब्दुल नदीम (वय १९), शेखएजाज शेख युनूस (वय ५0), हे जखमी झाले. यामध्ये शेख एजाज गंभीर जखमी झाले. सर्व जखमींना उपचारार्थ अकोला ये थे पाठविण्यात आले. पुढील तपास पोलीस करीत आहे.
अपघातात सात जखमी
By admin | Updated: January 7, 2016 02:25 IST