शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

४00 गावात बालसंरक्षण समित्यांचे गठण

By admin | Updated: August 28, 2015 00:12 IST

बालकांची सुरक्षा; ग्रामपंचायत अर्थसंकल्पात करावी लागणार ५ टक्के तरतूद.

वाशिम : महिलांसोबतच बालकांवरही वाढते अत्याचार रोखण्यासोबतच कायदेशीरदृष्ट्या बालकांच्या ह क्कांचे हनन होऊ नये यासाठी जिल्ह्यातील ४९३ पैकी ४00 ग्रामपंचायतीमध्ये ग्राम बालसंरक्षण समित्या (व्हीलेज चाईल्ड प्रोटेक्शन कमिटी) गठीत करण्यात आल्या आहेत.बालकांचे वाढते लैंगिक शोषण, बालविवाह, भिक्षेकरी मुलांचे वाढते प्रमाण आणि बालमजुरीचा गंभीर बनू पाहणारा प्रश्न पाहता ग्रामपातळी अशी समिती गठीत करून बालकांच्या नैसर्गिक हक्कांचे हनन टळावे यासाठी या ग्राम बालसंरक्षण समित्या कार्यरत राहणार आहेत.इंटिग्रेटेड चाईल्ड प्रोटेक्शन स्कीमतंर्गत केंद्र व राज्य शासनाच्या सहकार्याने शून्य ते १८ वयोगटातील बालकांची सुरक्षा व संवर्धन करण्याच्या दृष्टीकोणातून केंद्र सरकारने आखलेल्या धोरणाचा एक भाग म्हणून या समित्यांना ग्रामपातळीवर महत्त्वाची भूमिका बजावावी लागणार आहे. जुलै २0१३ मध्ये काढण्यात आलेल्या परिपत्रकानुसार या समित्या गठीत करणे अनिवार्य होते. त्यासाठी तीन दिवसांचा कालावधी ठरवून दिला होता. मात्र बाल संरक्षण अधिकारी विभागाकडून स्मरणपत्रे देऊनही या समित्या स्थापन होण्यास बराच कालावधी लागला. दरम्यान, या ग्राम बालसंरक्षण समित्या आता ४00 गावात गठीत झाल्या मुळे जिल्ह्याच्या लोकसंख्येच्या तुलनेत १५ टक्के असलेल्या शून्य ते १८ वयोगटातील मुलांच्या संरक्षणाच्या दृष्टीने एक महत्त्वाचे पाऊल उचलल्या गेले आहे. परिणामस्वरुप जिल्ह्यातील बालकांच्या नैसर्गिक न्याय हक्काचे तत्व तथा कायदेशीर मिळालेल्या हक्काचे हनन रोखण्यास जिल्हा प्रशासनास मोठी कसरत करावी लागणार आहे.अशी आहे ग्राम बाल संरक्षण समितीगावपातळीवर या समितीमध्ये शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, सामाजिक कार्यकर्ता, बचतगटातील महिला, १२ ते १८ वयोगटातील एक मुलगा, एक मुलगी, सरपंच, पोलिस पाटील, अंगणवाडी सेविका, अनुदानीत शाळेचे मुख्याध्यापक यांचा या समितीमध्ये समावेश आहे. सदस्य सचिव म्हणून समितीमध्ये अंगणवाडी सेविकेला स्थान आहे. वरील ग्राम बाल संरक्षण समिती बालकांची माहिती संकलीत करुन त्यांची काळजी घेणार आहेत.विकास पूनर्वसनाला महत्त्वया समितीच्या माध्यमातून बालकांच्या सर्वांंगिण विकासासोबतच पीडित, अन्यायग्रस्त बालकाचे त्याच्याच कुटूंबामध्ये योग्यपद्धतीने पूनर्वसन करणे, बालकांच्या विकासाचा आराखडा तयार करणे, दत्तक प्रावधान, बालगृहात ठेवणे किंवा एखाद्या ठिकाणी त्यांचे पूनर्वसन करून त्यांचे मुल्यमापन करण्याच्या दृष्टीने यामाध्यमातून शासनाने पुढाकार घेतला आहे. ६0 मुले अन्यायग्रस्त वाशिम जिल्यात शून्य ते १८ वयोगटातील ६0 मुलांना समस्या असल्याचे सध्याच्या पाहणीत आढळून आले आहे. यात काहींच्या पूनर्वसनाचा, संरक्षणाचा किंवा शिक्षण, अन्न, वस्त्रनिवार्‍याची समस्या आहे. त्यांच्या योग्य सुविधेसाठी सध्या बालसंरक्षण अधिकारी कक्षातर्फे प्रयत्न केले जात आहे.