शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

शाळांचीच घ्यावी लागणार शाळा; दहावीचा निकाल लटकण्याची चिन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:46 IST

वाशिम : दहावीच्या मूल्यमापन प्रक्रियेत शाळांनी केलेल्या मूल्यांकनात त्रुटी आढळल्या आहेत. मूल्यमापनासाठी शिक्षण मंडळाने एक परिपत्रक तयार करून ते ...

वाशिम : दहावीच्या मूल्यमापन प्रक्रियेत शाळांनी केलेल्या मूल्यांकनात त्रुटी आढळल्या आहेत. मूल्यमापनासाठी शिक्षण मंडळाने एक परिपत्रक तयार करून ते सर्व शाळांना पाठविले होते. मात्र बऱ्याच शाळांनी या परिपत्रकाचे नीट वाचन केले नाही. त्यातील मुद्दे समजून घेतले नाहीत. जिल्ह्यातील जवळपास ८० टक्के शाळांनी मूल्यमापनाचा टप्पा पूर्ण केला असून, उर्वरित २० टक्के शाळांच्या मूल्यमापनात त्रुटी आढळल्या आहेत. त्या दूर करण्याच्या सूचना त्यांना देण्यात आल्या आहेत.

परीक्षा मंडळाने ठरवून दिलेल्या निकषाप्रमाणे शाळांना दहावीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करून ४ जुलैपर्यंत त्याचा अहवाल शिक्षण मंडळाकडे सादर करायचा होता. यासाठी बोर्डाने दहावीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यांकन नेमके कसे करायचे, यासाठी एक परिपत्रक तयार करून ते सर्व शाळांना पाठविले होते. मात्र बऱ्याच शाळांनी या परिपत्रकाचे नीट वाचन केले नाही. त्यातील मुद्दे समजून घेतले नाहीत. त्यामुळे बोर्डाने यात त्रुटी काढल्याने जिल्ह्यातील जवळपास ७३ शाळांना पुन्हा मूल्यांकन करून ते सादर करण्यास सांगितले आहे. त्यामुळे दहावीचा निकाल नियोजित वेळी न लागता, त्याला पुन्हा विलंब होण्याची शक्यता आहे.

------------

मूल्यांकनातील या चुका कोणी सुधारायच्या

- दहावीचा निकाल तयार करताना ८० गुणांच्या आधारावर तो तयार करायचा होता. पण काहींनी तो १०० गुणांच्या आधारावर तयार केला.

- निकाल कसा तयार करायचा याच्या परिपत्रकाचे काही शाळेच्या शिक्षकांनी परिपूर्ण वाचन केले नाही, त्यामुळे त्यात त्रुटी आल्या. शिक्षण विभागाने निकाल कसा तयार करायचा यासाठी ऑनलाइन कार्यशाळा घेऊन शिक्षकांना मार्गदर्शन केले नाही. त्यामुळे बऱ्याच अडचणी आल्या.

- निकाल तयार करताना कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायची, याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळेच मूल्यांकन योग्य न झाल्याने बोर्डाने त्यात त्रुटी काढल्या आहेत.

००००००००००

मुख्याध्यापक म्हणतात...

कोट : आमच्या शाळेतील शिक्षकांनी दहावीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करताना बोर्डाने दिलेल्या परिपत्रकाचे सविस्तर वाचन करून निकाल तयार केला. तो बोर्डाकडे सादरसुद्धा केला असून, त्यात बोर्डाने कुठल्याही त्रुटी काढल्या नाहीत. परिपत्रकानुसार निकाल सादर केला आहे.

- स्नेहा पाथ्रीकर, मुख्याध्यापिका

कोट: दहावीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यांकन शाळांनी कसे करावे यासाठी बोर्डाने एक परिपत्रक तयार करून पाठविले होते. हे परिपत्रक सर्व शिक्षकांना नीट समाजावून सांगितले. निकाल तयार करताना काही त्रुटी आल्यास त्यांचे वेळीच संबंधित व्यक्तीशी बोलून निरसन केले. त्यामुळे आमच्या शाळेच्या निकालात कुठल्याच त्रुटी आलेल्या नाही.

- संजय तेलंग, मुख्याध्यापक

०००००००००००००

मुख्याध्यापकांचा कोट

कोट: बोर्डाने दहावीचा निकाल तयार करून तो कसा सादर करायचा, यासंदर्भात मार्गदर्शन केले होते. त्यानुसार सर्वच शाळांनी निकाल तयार करून तो बोर्डाकडे सादर केला आहे. काही शाळांच्या निकालात त्रुटी आढळल्या आहेत.

- रमेश तांगडे, शिक्षणाधिकारी.

००००००००००००

४० शाळांना कळविलेच नाही मूल्यांकन

जिल्ह्यात दहावीच्या एकूण ३६३ शाळा आहेत. त्यापैकी २२३ शाळांनी मूल्यांकन करीत निकाल तयार करून तो बोर्डाकडे सादर केला. पण ४० शाळांनी अद्याप मूल्यांकनच कळविले नाही. त्यांचे मूल्यांकन चुकीचे असल्यास त्रुटी दूर कराव्या लागतील. त्यामुळे दहावीचा निकाल थोडा लांबणीवर जाण्याची शक्यता आहे.

००००००००००००००००००००००००

जिल्ह्यातील शाळा- ३६३

मूल्यांकन झाले - २९०

मूल्यांकन बाकी -७३

००००००००००००००

दहावीतील एकूण विद्यार्थी १९,७१५

-एकूण मुले १०,६४६

- एकूण मुली ९०६९

०००००००००००