कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून विजय खंडरे डीडीएम (नाबार्ड ) वाशिम तसेच ध्यास संपर्कप्रमुख अश्विनी औताडे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमा पूजन करून तसेच हिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. अश्विनी औताडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन केले. तसेच महिलांना स्वच्छता या विषयावर मार्गदर्शन करून ‘जेएलजी’विषयी माहिती दिली. तसेच महिलांनी स्वतः व्यवसाय करून आत्मनिर्भर बनने ही काळाची गरज असल्याचे सांगितले. विजय खंडरे यांनी महिलांना मार्गदर्शन करताना नाबार्डविषयी माहिती व नाबार्ड द्वारा राबविण्यात येणाऱ्या विविध विकासात्मक योजना याविषयी माहिती दिली. स्वच्छता साक्षरता अभियानांतर्गत गावात प्रत्येक घरी शौचालय, बाथरूम, पिण्याच्या पाण्याची सोय, सांडपाण्याचे व्यवस्थापन या गरजा पूर्ण करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या निधीकरिता बँकेद्वारा कर्ज उपलब्ध करून देण्याबाबत माहिती महिलांना दिली. तसेच बँकद्वारा महिलांना जनधन खाते, विमा योजना, सुकन्या योजना, एटीएम इन्शुरन्सविषयी महिलांना मार्गदर्शन केले. शौचालय वापर पाणीपुरवठा आणि आवश्यक अनावश्यक खर्च याविषयी महिलांसोबत चर्चा करण्यात आली. महिलांचे मत जाणून घेण्यात आले. या कार्यक्रमाला गावातील महिलांचा प्रतिसाद लाभला. आभार प्रदर्शन शारदा पातळे यांनी मानले.
पार्डी ताड येथे स्वच्छता साक्षरता अभियान जनजागृती कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:23 IST