शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

‘महाराजस्व अभियान’मुळे महसुली कामे लागताहेत मार्गी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 01:50 IST

वाशिम: महसूल प्रशासन अधिक कार्यक्षम, गतिमान आणि पारदर्शक  करण्यासाठी ‘महाराजस्व अभियान’ राबविले जात असून,  सर्वसामान्यांची रेंगाळलेली, प्रलंबित असलेली कामे यामुळे मार्गी  लागत आहेत. यंदाही या अभियानास १ ऑगस्टपासून सुरुवात झाली  असून, ३१ जुलै २0१८ पर्यंत  या अंतर्गत प्रशासनाने कुठली कामे  करायची आहेत, यासंदर्भातील निर्देश शासनाने पारित केले आहेत.

ठळक मुद्देअभियानाला दिले विस्तारित स्वरूपवर्षभर विविध उपक्रमांची आखणी

लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम: महसूल प्रशासन अधिक कार्यक्षम, गतिमान आणि पारदर्शक  करण्यासाठी ‘महाराजस्व अभियान’ राबविले जात असून,  सर्वसामान्यांची रेंगाळलेली, प्रलंबित असलेली कामे यामुळे मार्गी  लागत आहेत. यंदाही या अभियानास १ ऑगस्टपासून सुरुवात झाली  असून, ३१ जुलै २0१८ पर्यंत  या अंतर्गत प्रशासनाने कुठली कामे  करायची आहेत, यासंदर्भातील निर्देश शासनाने पारित केले आहेत.सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, शेतमजुरांचा दैनंदिन  कामकाजासंदर्भात महसूल प्रशासनाशी थेट संबंध येतो. त्यासाठी पूर्वी  सुवर्णजयंती राजस्व अभियान राबविले जायचे. दरम्यान, महसूल  प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम आणि गतिमान करण्याच्या  दृष्टीने १ ऑगस्ट २0१५ पासून महाराजस्व अभियान राबविण्यात येत  आहे. दरम्यान, १ ऑगस्ट २0१७ पासून अधिक विस्तारित स्वरूपात  हे अभियान राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. ‘महाराजस्व अभियान’च्या माध्यमातून जिल्हा, तालुका, गावाच्या  भूसंपत्तीचे अचूक व्यवस्थापन व नियमन करण्यासाठी शिवारफेरीचे  आयोजन करणे, गटनिहाय पोट खराब क्षेत्र सर्वेक्षण नोंदी घेणे, पोत  सुधारलेल्या गटांच्या जमिनींचे सर्वेक्षण करणे व नोंदी घेणे, सिंचीत  क्षेत्राचे सर्वेक्षण, पिके व फळबागांच्या वस्तूनिष्ठ नोंदी घेणे, पाणी पुरवठा साधनांच्या नोंदी घेणे, नदी-नाले-ओढय़ांवर झालेल्या अ ितक्रमणाची माहिती संकलित करणे यांसह इतरही विविध उपक्रम  राबविण्याचे निर्देश शासनाने महसूल विभागाला दिले आहेत.

महाराजस्व अभियानातील लोकाभिमुख घटक- विविध दाखले शिबिरे घेऊन प्रदान करणे- विस्तारित समाधान योजना राबविणे- महसूल अधिकार्‍यांकडे सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ प्रलंबित  असणारे सर्व अर्धन्यायिक प्रकरणे निकाली काढणे.- एका महिन्यावर प्रलंबित असलेले फेरफार निकाली काढणे व  त्याकरिता मंडळ मुख्यालयी फेरफार अदालत घेणे- ई-फेरफार सुविधा प्रत्येक गावात उपलब्ध करुन देणे- भूसंपादन केल्याप्रकरणी कमी-जास्त पत्रके तयार करून गाव दप्तर  अद्ययावत करणे- गाव नकाशाप्रमाणे अतिक्रमित व बंद झालेले गाडी रस्ते, पाणंद,  शेतरस्ते, शिवार रस्ते, शेतावर जाण्याचे पायमार्ग मोकळे करणे आदी  लोकाभिमुख घटकांचा महाराजस्व अभियानात समावेश करण्यात  आलेला आहे.

महाराजस्व अभियानाची प्रभावीपणे अंमलबजावणी सुरू आहे. चालू  वर्षाच्या १ ऑगस्टपासून पुढील वर्षाच्या ३१ जुलै २0१८ पर्यंत पुन्हा  ही मोहीम राबविली जात असून, या अंतर्गत सर्वसामान्य नागरिकांची  महसूल विभागाशी संबंधित कामे निकाली काढण्य जिल्हा  प्रशासन पुरेपूर प्रयत्न करणार आहे. तशा सूचना कर्मचार्‍यांना दिल्या  आहेत.- शैलेष हिंगे, निवासी उपजिल्हाधिकारी, वाशिम