शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
2
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
3
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
4
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
5
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
6
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
7
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
8
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
9
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
10
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
11
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
12
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
13
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
14
कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
15
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
16
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
17
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
18
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
19
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
20
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
Daily Top 2Weekly Top 5

शेतक-यांचा पळस वृक्ष रक्षणाचा संकल्प  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2017 20:12 IST

वाकद : रिसोड तालुक्यातील बाळखेड येथील शेतकºयांनी पोळा सण पर्यावरण पुरक पद्धतीने साजरा करण्याचा एकमताने संकल्प केला. या अनुषंगाने बाळखेड येथील समस्त कास्तकाराने मेढी म्हणून वापरण्यात येणारे पळसाचे झाड न तोडण्याचा संकल्प केला. 

ठळक मुद्देबाळखेड येथे बैठकपोळा पर्यावरणपुरक पद्धतीने साजरा होणार 

लोकमत न्यूज नेटवर्कवाकद : रिसोड तालुक्यातील बाळखेड येथील शेतकºयांनी पोळा सण पर्यावरण पुरक पद्धतीने साजरा करण्याचा एकमताने संकल्प केला. या अनुषंगाने बाळखेड येथील समस्त कास्तकाराने मेढी म्हणून वापरण्यात येणारे पळसाचे झाड न तोडण्याचा संकल्प केला. आगामी पोळा सणाच्या पृष्ठभूमीवर पर्यावरण रक्षण करण्याच्या उद्देशाने पर्यावरण शिक्षक गजानन मुलंगे यांनी बाळखेड येथे एका बैठकीचे आयोजन गुरुवारी केले. यामध्ये मालती इंगोले, सरपंच ग्रा. पं. बाळखेड, शिवाजीराव अवताडे सदस्य पं. स. रिसोड, बि.के. उबाळे सहा. लागवड अधिकारी सामाजिक वनीकरण विभाग रिसोड आदिंची प्रामुख्याने उपस्थिती होती. या बैठकीत  मुलंगे यांनी शेतकºयांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, पळस हा बहुपयोगी वृक्ष असून भारत, मॅनमार आणि श्रीलंका येथे सर्वात जास्त प्रमाणात आढळून येतो. पळसापासून द्रोण व पत्रावळी तयार करतात एवढाच काय तो उपयोग जनसामान्यांना माहित आहे; परंतु पळसाचे त्याशिवाय अनेक  फायदे आहेत, हे विसरुन चालणार नाही. हत्ती, शेळी आणि म्हशी सारखे अनेक पाळीव प्राणी पळसाचीच पाने आवडीचे खातात. पळसाचे खोड, साल आणि मुळापासून उत्तम दर्जाचा कायद तयार होतो. बाभळीच्या झाडाप्रमाणे पळसापासूनसुद्धा डिंक मिळतो. त्या डिंकाला लाख म्हणून उपयोगात आणल्या जाते. पूर्वीच्या काळी पळसाच्या मुळाच्या सालीपासून तयार करण्यात आलेल्या दोरीचा उपयोग कास्तकार शेती कामासाठी करीत असत. जुन, जुलै महिन्यात येणाºया पळसाच्या चपट्या शेंगाच्या उपयोग देशी व आयुर्वेदीक औषधीमध्ये करतात. १९७५ सालापासून थर्माकॉलच्या पत्रावळ््या आणि द्रोण तयार करण्याचे कारखाने सुरु झाल्यापासून पळसाची उपयोगिता संपुष्टात आलीआणि त्याची सर्रास कत्तल सुरु झाली. भरीस-भर म्हणून पोळ््याच्या सणालासुद्धा पळसाची एक, दोन फांदी न आणता रुढी पंरपरेनुसार पळसाची झाडे तोडून घरापुढे उभे करण्यात येतात यामुळे पर्यावरणाचा ºहास होत आहे. कार्यक्रमाच्या अनुषंगाने डॉ. विजय ढोले यांनी पळसाची उपयोगिता व संवर्धन याबाबत जनजागृतीपर बाळखेड, वाकद आणि रिसोड येथे दोन हजार पत्रके वितरीत केली. कार्यक्रमाचे सूत्र संचालन अजय गायकवाड, तर आभार सचिन पºहाड यांनी मानले.