शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागात ‘अभ्यासिका’ निर्मितीचा संकल्प !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:43 IST

स्पर्धेच्या युगात ग्रामीण भागातील विद्यार्थी टिकावा, तसेच दहावी व बारावीनंतरच्या करिअरबाबत त्याला इत्यंभूत माहिती मिळावी, अभ्यास करण्यासाठी सुविधा उपलब्ध ...

स्पर्धेच्या युगात ग्रामीण भागातील विद्यार्थी टिकावा, तसेच दहावी व बारावीनंतरच्या करिअरबाबत त्याला इत्यंभूत माहिती मिळावी, अभ्यास करण्यासाठी सुविधा उपलब्ध व्हावी याअनुषंगाने समाजकल्याण विभागाच्या निधीचा उपयोग करून ग्रामीण भागात ग्रामपंचायतींनी आणि शहरी भागात नगरपालिका व नगरपंचायतींनी अभ्यासिका तयार करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी १५ ऑगस्ट रोजी व्यक्त केली होती. त्याअनुषंगाने चाचपणी केली जात आहे. ग्रामीण भागातील मागास आणि आदिवासी वस्त्यांमध्ये विद्यार्थ्यांना चांगल्याप्रकारे अभ्यास करण्यासोबतच स्पर्धा परीक्षांची तयारी करता यावी, यासाठी अभ्यासिका आणि या अभ्यासिकेत बसण्यासाठी बेंच, वीज व पंख्यांच्या व्यवस्थेसाठी समाजकल्याण विभागाच्या निधीचा उपयोग करता येईल का? या अनुषंगानेदेखील विचार केला जात आहे. मात्र, कोरोनाकाळात अगोदरच विविध योजनांसाठी निधी देताना शासनाकडून हात आखडता घेतला जात असल्याने अभ्यासिकेसाठी खरोखरच निधी मिळेल का? असा प्रश्नही विद्यार्थ्यांमधून उपस्थित केला जात आहे.

०००

...तर विद्यार्थ्यांची गैरसोय टळणार!

ग्रामीण भागातील मागास आणि आदिवासी वस्त्यांमधील विद्यार्थ्यांसाठी अभ्यासासाठी फारशा सुविधा उपलब्ध नाहीत. या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अभ्यासिकेची नितांत आवश्यकता आहे. समाजकल्याण विभागाच्या विविध योजनांमधून प्राप्त निधीतून अभ्यासिका तयार केल्या, तर खऱ्याअर्थाने विद्यार्थ्यांची सोय होणार आहे, असा सूर ग्रामीण भागातून उमटत आहे.