शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

गरज १२00 हेक्टरची; भूसंपादन केवळ सात हेक्टर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 02:25 IST

‘नागपूर-मुंबई सुपर कम्युनिकेशन वे’ अर्थात समृद्धी महामार्गासाठी जिल्ह्यातील १२00 हेक्टर जमीन संपादित करावी लागणार आहे;  मात्र ऑगस्टपासून सुरू झालेल्या भूसंपादन प्रक्रियेंतर्गत गेल्या ४0 दिवसांत केवळ ७ हेक्टर जमीन संपादित होऊ शकली आहे. त्यामुळे उर्वरित ११९३ हेक्टर जमिनीचे संपादन करण्यासाठी प्रशासनाला अडथळय़ांची शर्यत पार करावी लागणार आहे. 

ठळक मुद्देसमृद्धी महामार्ग५४ पैकी १४ गावांच्या मूल्यांकनाची प्रक्रिया पूर्ण

सुनील काकडे। लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: ‘नागपूर-मुंबई सुपर कम्युनिकेशन वे’ अर्थात समृद्धी महामार्गासाठी जिल्ह्यातील १२00 हेक्टर जमीन संपादित करावी लागणार आहे;  मात्र ऑगस्टपासून सुरू झालेल्या भूसंपादन प्रक्रियेंतर्गत गेल्या ४0 दिवसांत केवळ ७ हेक्टर जमीन संपादित होऊ शकली आहे. त्यामुळे उर्वरित ११९३ हेक्टर जमिनीचे संपादन करण्यासाठी प्रशासनाला अडथळय़ांची शर्यत पार करावी लागणार आहे. नागपूर ते मुंबई या ७१0 किलोमीटर अंतराचा समृद्धी महामार्ग वाशिम जिल्ह्यातील ९८ किलोमीटरचे अंतर पार करून ५४ गावांना छेदून जाणार आहे. त्यासाठी २२00 शेतकर्‍यांकडून सुमारे १२00 हेक्टर जमिन संपादित करावी लागणार आहे. त्यानुसार, १ ऑगस्ट रोजी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सरळ खरेदीने भूसंपादन प्रक्रियेस प्रारंभ करण्यात आला. त्या दिवशी पाच शेतकर्‍यांच्या जमिनी संपादित करून संबंधितांना तत्काळ धनादेश वितरित करण्यात आले. त्यामुळे समृद्धी महामार्गाच्या भूसंपादन प्रक्रियेस गती प्राप्त होईल, अशी शक्यता वर्तविली जात असताना त्यास अपेक्षित यश अद्याप मिळू शकलेले नाही. गेल्या ४0 दिवसांत केवळ ९ शेतकर्‍यांच्या खरेदी झाल्या असून, एकूण ७ हेक्टर जमिनीचे संपादन पूर्ण होऊ शकले आहे. असे असले तरी येत्या आठवड्यापासून या प्रक्रियेस गती देऊन सप्टेंबरअखेर आवश्यक १२00 हेक्टर जमिनीपैकी किमान ५0 टक्के भूसंपादन झालेले असेल, असा दावा उपजिल्हाधिकारी तथा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे क्षेत्रीय अधिकारी सुनील माळी यांनी केला.

५४ पैकी १४ गावांच्या मूल्यांकनास मंजुरी!समृद्धी महामार्गासाठी वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड, मंगरूळपीर, मालेगाव आणि रिसोड या चार तालुक्यांमधील १२00 हेक्टर जमीन संपादित केली जाणार आहे. ‘रेडी रेकनर’नुसार जमिनींचे दर निश्‍चित करण्यासाठी आतापर्यंत ५४ गावांपैकी १४ गावांच्या मूल्यांकनास जिल्हास्तरीय समितीने मंजुरात दर्शविली आहे. त्यात अलीर्मदापूर, पिंप्री मोखड, कतनापूर, इमामपूर, खेर्डी, बग्गी, निंबा जहागीर, आखतवाडा, देवचंडी, मजलापूर, एडशी, शेंदुरजना मोरे, अनसिंग, वरदरी खु. या गावांचा समावेश आहे. संबंधित गावांमध्ये आतापर्यंत १४ शेतकर्‍यांच्या जमिनींच्या खरेदी आटोपल्या असून, त्यांना २ कोटी ३५ लाख रुपयांचा मोबदला वाटप करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

समृद्धी महामार्गाकरिता जमिनी देण्यास शेतकर्‍यांचा पूर्वीसारखा विरोध आता राहिलेला नाही. त्यामुळे भूसंपादन प्रक्रियेस आता निश्‍चितपणे गती मिळणार आहे. सप्टेंबर महिन्याअखेर महामार्गासाठी आवश्यक १२00 हेक्टर जमिनीपैकी किमान ५0 टक्के जमिनीचे संपादन करण्याचे उद्दिीट प्रशासनाने बाळगले आहे.- सुनील माळी,उपजिल्हाधिकारी, वाशिम.