०००
आज पोलिओ लसीकरण मोहीम
वाशिम : जिल्ह्यात रविवार, ३१ जानेवारी २०२१ रोजी सकाळी आठ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. याकरिता आरोग्य यंत्रणेने आवश्यक तयारी पूर्ण केली असल्याचे जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. अविनाश आहेर यांनी शनिवारी सांगितले.
०००
घरकुल लाभार्थींना मिळाले अनुदान !
रिठद : रिसोड पंचायत समिती अंतर्गत येणाºया रिठद परिसरातील जवळपास १५ ते २० लाभार्थींना रमाई आवास योजनेअंतर्गतचे अनुदान २७ ते २९ जानेवारीदरम्यान मिळाले. या आठवड्यात जवळपास २०० लाभार्थ्यांच्या बँक खात्यात अनुदान जमा करण्यात आल्याचे बीडीओ हरिनारायण परिहार यांनी सांगितले.
०००
सरपंच पदासाठी रस्सीखेच !
केनवड : जिल्हा परिषद गटाचे गाव असलेल्या केनवडेसह परिसरातील नेतन्सा, नावली, गोभणी येथे सरपंच पदासाठी अनेकजण इच्छुक आहेत. सरपंच पदाचे आरक्षण नेमके काय निघणार यावर डोळा ठेवून इच्छुक सदस्यांनी ‘गॉड फादर’च्या भेटीगाठी वाढविल्याचे दिसून येते.
००००