सर्वप्रथम महात्मा गांधी व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन अध्यक्ष महोदय व प्राचार्या सुधा इंगोले यांच्या हस्ते करण्यात करण्यात आले. ध्वजारोहणापूर्वी भारतीय राज्यघटनेच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. ध्वजारोहणानंतर व्ही. बी. पाटील यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला गावातील प्रतिष्ठित नागरिक, सेवानिवृत्त शिक्षक अरुण खुपसे, गजानन जोशी, देवीदास सावरकर आदींसह शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
मानोरा येथे ठिकठिकाणी प्रजासत्ताक दिन साजरा
मानोरा : २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिन मानोरा परिसरात ठिकठिकाणी उत्साहात साजरा करण्यात आला.
राष्ट्रमाता इंदिरा गांधी विद्यालय येथे बाजार समितीचे माजी सभापती डॉ. संजय रोठे यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी प्राचार्या रजनी मांडवगडे, वंदना रोठे, आर. व्ही. बारस्कर, शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते.
रहेमानिया उर्दू हायस्कूल येथे संस्थेचे अध्यक्ष हाजी वहिदुद्दीन शेख यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी प्राचार्य मो. इकबाल, शिक्षक, कर्मचारी यांची उपस्थिती होती.
वसंतराव नाईक विद्यालय येथे मुख्याध्यापक प्रसेनजित भगत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी शिक्षक अनंत खडसे यांच्यासह शिक्षक, कर्मचारी यांची उपस्थिती होती.
पंचायत समिती मानोरा येथे सभापती सौ. सागर प्रकाश जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपसभापती रूपाली राऊत, पंचायत समिती सदस्य प्रवीण धोटे, पंचायत समिती सदस्य, अधिकारी, कर्मचारी यांची उपस्थिती होती.
यशवंतराव चव्हाण विद्यालय गिर्डा येथे शाळा समितीचे अध्यक्ष अण्णासाहेब पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी मुख्याध्यापक वीरेंद्र पाटील, शिक्षक सुधाकर राठोड, जावेद खान आदी शिक्षक, कर्मचारी यांची उपस्थिती होती.
आपास्वामी शिक्षण संस्थेत प्रजासत्ताक दिन साजरा
मानोरा : शेंदुरजना अढाव येथील आपास्वामी शिक्षण संस्थेत २६ जानेवारीला विविध विद्या शाखांच्या वतीने प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
संस्थेचे अध्यक्ष प्रा. भाऊसाहेब काळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी सचिव किशोर काळे, गणेश काळे, अनुप अढ़ाव, दिलीप अढ़ाव, माजी प्राचार्य डॉ. तिवारी, प्राचार्य बी. एस. कव्हर, पर्यवेक्षक एच. एम. हांडे, जुगलकिशोर अग्रवाल आदी उपस्थित होते. संचालन उपप्रचार्य सुधाकर चिंचोले यांनी केले.