जिल्ह्यात विविध ठिकाणी प्रजासत्ताक दिन उत्साहात
मान्यवरांची उपस्थिती : महाविद्यालयात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
वाशिम : जिल्ह्यात विविध ठिकाणी २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. शासकीय संस्था, प्रशासकीय कार्यालयांसह शाळा, महाविद्यालयात या निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
वसंतराव विद्यालय, वरोली
मानोरा : वरोली येथील वसंतराव विद्यालयात माजी विद्यार्थी तथा संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे विद्यार्थी विकास समिती सदस्य मयूर राऊत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या प्रसंगी योगीराज हांडे या माजी विद्यार्थ्याने छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा शाळेला भेट दिली. या निमित्त विद्यार्थ्यांची शाळेविषयी आपुलकी, प्रेम, जिव्हाळा दिसून आला. माजी विद्यार्थ्यांची भेट व मार्गदर्शनामुळे शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळाली, असे मत मुख्याध्यापक योगेश देशमुख यांनी व्यक्त केले.
---
मानोरा येथे ठिकठिकाणी प्रजासत्ताक दिन साजरा
मानोरा : शहरात विविध ठिकाणी प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. राष्ट्रमाता इंदिरा गांधी विद्यालय येथे बाजार समितीचे माजी सभापती डॉ. संजय रोठे यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी प्राचार्या रजनी मांडवगडे, वंदना रोठे, आर. व्ही. बारस्कर, शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते. रहेमानिया उर्दू हायस्कूल येथे संस्थेचे अध्यक्ष हाजी वहिदुद्दीन शेख यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी प्राचार्य मो. इकबाल, शिक्षक, कर्मचारी यांची उपस्थिती होती. वसंतराव नाईक विद्यालय येथे मुख्याध्यापक प्रसेनजीत भगत यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी शिक्षक अनंत खडसे यांच्यासह शिक्षक, कर्मचारी यांची उपस्थिती होती. पंचायत समिती मानोरा येथे सभापती सागर प्रकाश उपस्थिती होती. य.च. विद्यालय गिर्डा येथे शाळा समिती अध्यक्ष अण्णासाहेब पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी मुख्याध्यापक वीरेंद्र पाटिल, शिक्षक सुधाकर राठोड, जावेद खान आदी शिक्षक, कर्मचारी यांची उपस्थिती होती.
-----
आपास्वामी शिक्षण संस्था शेंदुरजना अढाव
मानोरा : शेंदुरजना अढाव येथील आपास्वामी शिक्षण संस्थेत २५ जानेवारी रोजी विविध विद्या शाखांकडून प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. संस्थाध्यक्ष प्रा. भाऊसाहेब काळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी सचिव किशोर काळे, गणेश काळे, अनुप अढ़ाव, दिलीप अढ़ाव, माजी प्राचार्य डॉ. तिवारी, प्राचार्य बी. एस. कव्हर उपस्थित होते.
------
नैसर्गिक पर्यावरण ग्रुपकडून वृक्षरोपांचे वितरण
मंगरुळपीर : तालुक्यातील शेलूबाजार येथील मल्हार मावळा ग्रुप व नैसर्गिक पर्यावरण ग्रुपकडून प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून शेलूबाजार परिसरातील विविध संस्था, शाळा, प्रशासकीय कार्यालयात वृक्षरोपांचे वितरण करण्यात आले.
मल्हार मावळा ग्रुप ग्रुपकडून राबविण्यात आलेल्या उपक्रमांतर्गत प्रतिष्ठित नागरिक, तंटामुक्ती अध्यक्ष, पोलीस पाटील, पोलीस कर्मचारी, अधिकारी, पत्रकार, जि.प. सदस्य, पं. स. सदस्य, ग्रा.पं. सदस्य, राजकारणी, व्यावसायिक, व्यापाऱ्यांसह सर्वसामान्यांना भारतमातेच्या राष्ट्रध्वज व एक वृक्षरोपांचे वितरण करण्यात आले. नैसर्गिक पर्यावरण ग्रुपच्या सदस्यांनी मंगरूळपीर येथील नायब तहसीलदार, ठाणेदारांना राष्ट्रध्वजाचे वाटप करण्यात आले आहे. यावेळी संघटनेचे अध्यक्ष शरद तट्टू, अरविंद तिरके, डॉ. कैलास कालापाड, रमेश धवने, ओमकार खिराडे, तसेच नैसर्गिक पर्यावरण ग्रुप मंगरुळपीरच्या अध्यक्ष तेजस्विनी काळे, विद्या राऊत, श्रद्धा राऊत, केशर एकाडे, अनिता रायके, बबिता दहातोडे, सुनीता रायके, माधुरी सुरोसे, मीरा त्राटक, रायके यांचे सहकार्य लाभले.