शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

वसतिगृह असुविधांप्रकरणी मागविला अहवाल

By admin | Updated: June 24, 2016 00:03 IST

वाशिम जिल्हाधिकारी, उपसंचालकांनी घेतली ‘लोकमत’च्या वृत्ताची तडकाफडकी दखल.

सुनील काकडे / वाशिमसामाजिक न्याय विभागामार्फत चालविल्या जाणार्‍या वसतिगृहांमध्ये उद्भवलेल्या गंभीर समस्यांबाबत 'लोकमत'ने बुधवार, २३ जूनच्या अंकात प्रकाशित केलेल्या ह्यस्टिंग ऑपरेशनह्णची तडकाफडकी दखल घेण्यात आली. जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी आणि अमरावती उपसंचालक कार्यालयाने याप्रकरणी वाशिमच्या सामाजिक न्याय विभागाला विनाविलंब सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या विद्यार्थ्यांंसाठी लाखो रुपये खचरून सामाजिक न्याय विभागामार्फत वसतिगृहे चालविली जातात. मात्र, शासनाकडून मिळणारा पैसा मधातच ह्यगडपह्ण होत असल्याने वसतिगृहांमध्ये विविध समस्या उद्भवल्याचे वास्तव ह्यलोकमतह्णने मंगळवार, २0 जून रोजी केलेल्या ह्यस्टिंग ऑपरेशनह्णमधून उघड झाले. वाशिम शहरातील पुसद रोडवर असलेल्या वसतिगृहाच्या भाडेतत्वावरील इमारतीत पाच छोट्या स्वरूपातील खोल्या आणि एका हॉलमध्ये विद्यार्थ्यांंच्या राहण्याची सोय करण्यात आलेली आहे. कडी-कोंड्याविना असलेले दरवाजे, ठिकठिकाणी साचलेला कचरा, पसरलेली दुर्गंंधी, तुटलेले पलंग, मळालेल्या गाद्या, भिंतींची झालेली दुरवस्था, आदी गंभीर प्रकार लोकमतच्या पाहणीत आढळून आले. सामाजिक न्याय विभागाकडूनच चालविल्या जाणार्‍या शासकीय बहूद्देशीय संमिश्र अपंग केंद्रातही अनेक गंभीर समस्या उद्भवल्या असून तेथे एकही शौचालय नाही, सर्वात वरच्या मजल्यावर असलेल्या स्नानगृहांची प्रचंड दुरवस्था झालेली आहे. एका हॉलमध्ये सर्वच विद्यार्थ्यांंना अक्षरश: कोंबण्यात येते. झोपण्यासाठी एकही पलंग नसल्यामुळे विद्यार्थ्यांंना मळालेल्या गाद्यांवर जमिनीवरच झोपावे लागत असल्याचे चित्र या वसतिगृहामध्ये दिसून आले. जिल्ह्यातील कारंजा लाड येथेदेखील सामाजिक न्याय विभागामार्फत मुलांचे वसतिगृह चालविले जाते. तेथेही प्रचंड प्रमाणात असुविधा असल्याने विद्यार्थ्यांंची गैरसोय होत असल्याची वस्तूस्थिती ह्यलोकमतह्णने उजागर केली. दरम्यान, या गंभीर प्रकरणाची तडकाफडकी दखल घेवून वाशिमचे जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी तथा सामाजिक न्याय विभागाच्या अमरावती येथील उपसंचालकांनी वाशिमच्या सामाजिक न्याय विभागाच्या उपायुक्तांना यासंदर्भात विनाविलंब अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.