शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
3
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
4
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
5
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
6
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
7
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
8
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
9
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
10
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
11
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
12
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
13
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
14
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
15
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
16
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
17
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
18
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
19
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
20
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!

तिसरी लाट रोखण्यासाठी तयार; तालुकास्तरावर ऑक्सिजन प्लांट प्रस्तावित !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:38 IST

वाशिम : कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून, ही लाट रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे पूर्वतयारी केली जात आहे. ...

वाशिम : कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून, ही लाट रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे पूर्वतयारी केली जात आहे. तालुकास्तरावर ऑक्सिजन निर्मिती प्लांट प्रस्तावित असून, जिल्हा कोविड हॉस्पिटल तसेच कारंजा उपजिल्हा रुग्णालय येथे ऑक्सिजन बेडही वाढणार आहेत.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यापासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्या तुलनेत आरोग्यविषयक सुविधा अपुऱ्या पडत आहेत. पूर्वीच्या तुलनेत आता सरकारी आरोग्यविषयक सुविधादेखील हळूहळू उपलब्ध होत असून, जिल्हा कोविड हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर बेड उपलब्ध करण्याला सर्वाधिक प्राधान्य देण्यात येत आहे. अशातच तीन ते चार महिन्यांनंतर कोरोनाची तिसरी लाट येण्याचा अंदाज तज्ज्ञांकडून वर्तविण्यात येत आहे. ही शक्यता गृहीत धरून जिल्ह्यात उपाययोजना केल्या जात आहेत. वाशिम व कारंजा येथे अनुक्रमे ७५ व ५० ऑक्सिजन खाटा वाढविण्याचे नियोजन आहे. याशिवाय तालुकास्तरावर ऑक्सिजन निर्मिती प्लांट उभारण्याचे प्रस्तावित आहे.

००००००

प्रशासकीय यंत्रणा तयार

ऑक्सिजन...

ऑक्सिजनची कमतरता राहू नये, याकरिता वाशिम येथे तीन व कारंजा येथे एक ऑक्सिजन निर्मिती प्लांट साकारला आहे. याशिवाय वाशिम, मंगरूळपीर, रिसोड व मालेगाव येथे प्रत्येकी एक प्लांट प्रस्तावित आहे.

०००

ऑक्सिजन बेड

जिल्हा कोविड हॉस्पिटल तसेच कारंजा उपजिल्हा रुग्णालय येथे आणखी १२५ ऑक्सिजन बेड वाढविण्याचे नियोजन आहे.

००

कोविड केअर सेंटर

जिल्ह्यात सध्या आठ कोविड केअर सेंटर आहेत. तिसऱ्या लाटेत तालुकास्तरावर आणखी काही कोविड सेंटर वाढविण्याचे नियोजन आहे.

०००

औषधी

रेमडेसिविर इंजेक्शन यासह अन्य आवश्यक औषधसाठा सध्या उपलब्ध होत आहे. मागणीनुसार औषधसाठा उपलब्ध होईल, याचे नियोजन आहे.

००००

कोठे किती बेड वाढविण्याची तयारी

वाशिम ७५

कारंजा ५०

(याशिवाय संभाव्य रुग्णसंख्या पाहून अन्य ठिकाणीदेखील बेड वाढविण्याचे नियोजन राहणार आहे.)

००००

नियोजनाला प्राधान्य...

कोट ..

संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी वरिष्ठांच्या मार्गदर्शनात ऑक्सिजन बेड, ऑक्सिजन निर्मिती प्लांट, कोविड केअर सेंटर आदींचे नियोजन केले जात आहे.

- डॉ. मधुकर राठोड,

जिल्हा शल्य चिकित्सक, वाशिम.