शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

पाऊस थांबता थांबेना; उमेदवार कसे गाठतील मतदारांना?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:45 IST

वाशिम : जिल्हा परिषदेचे १४ गट आणि पंचायत समितीच्या २८ गणांसाठी होऊ घातलेली पोटनिवडणूक अवघ्या १० दिवसांवर येऊन ठेपली ...

वाशिम : जिल्हा परिषदेचे १४ गट आणि पंचायत समितीच्या २८ गणांसाठी होऊ घातलेली पोटनिवडणूक अवघ्या १० दिवसांवर येऊन ठेपली आहे. यामुळे निवडणूक रिंगणात उतरलेल्या इच्छुकांना मतदारांपर्यंत पोहोचून त्यांची मनधरणी करण्यासाठी कमी कालावधी शिल्लक आहे. असे असताना पाऊस थांबत नसल्याने मतदारांना गाठावे कसे, असा प्रश्न उमेदवारांसमक्ष उभा ठाकला आहे.

वाशिम जिल्हा परिषदेचे ५२ गट आणि जिल्ह्यातील सहा पंचायत समित्यांच्या १०४ गणांसाठी ७ जानेवारी २०२० रोजी निवडणूक झाली होती. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षण होत असल्याचा मुद्दा समोर करून सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी प्रवर्गातील सदस्यांची पदे रद्द करून पोटनिवडणूक घेण्याचा निर्णय दिला. त्यानुसार, जिल्हा परिषदेचे १४ गट आणि पंचायत समित्यांच्या २७ जागांसाठी येत्या ५ ऑक्टोबर रोजी पोटनिवडणूक होत आहे.

जिंकण्याचा इरादा पक्का करून निवडणूक रिंगणात उतरलेल्या प्रमुख पक्षांच्या संभाव्य उमेदवारांनी याआधी डोअर टू डोअर भेटीवर भर दिला; मात्र गेल्या काही दिवसांपासून जिल्हाभरात संततधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे अनेक गावांमधील पिकांची अतोनात हानी झाली आहे. त्या विवंचनेत शेतकरी सापडले असून इच्छुक उमेदवारांच्या तोंडचे पाणी मात्र यामुळे पळाल्याची स्थिती निर्माण झाली आहे.

.........................

निवडणूक ठेवा बाजूला, आधी नुकसानीचे पाहा

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची पोटनिवडणूक अवघ्या १० दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यात बाजी मारायची असेल तर मतदारांपर्यंत वेळेत पोहोचणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने काही उमेदवार चिखल तुडवत आपापल्या सर्कलमध्ये धडकत आहेत; मात्र निवडणूक ठेवा बाजूला आधी पावसामुळे पिकांच्या नुकसानीचे काही होते का ते पाहा, असा सूर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांमधून उमटत आहे.