शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी, कर्मचाºयांच्या वादामुळे तूर खरेदी थांबली

By admin | Updated: May 14, 2017 14:22 IST

तूर अवकाळी पावसामुळे ओली झाल्यानंतर मोजण्यास नकार दिल्याने नाफेडचे कर्मचारी आणि शेतकºयांत शनिवारी वाद झाला.

मालेगावातील प्रकरण: शेतकऱ्यांना सोमवारपर्यंत प्रतिक्षा करावी लागणार

वाशिम: बाजार समितीच्या ओट्यावर मोकळी पडलेली तूर अवकाळी पावसामुळे ओली झाल्यानंतर मोजण्यास नकार दिल्याने नाफेडचे कर्मचारी आणि शेतकऱ्यांत शनिवारी वाद झाला. त्यामुळे येथील खरेदी बंद पडली. आता शेतकऱ्यांना सोमवारपर्यंत तूर मोजणीची प्रतिक्षा करावी लागणार आहे. शासनाने ३१ मेपर्यंत नाफेडच्या तूर खरेदीला मुदतवाढ दिली. त्यामुळे नाफेडच्या केंद्रावर आधीपासूनच प्रतिक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना दिलास मिळाला. तसेच नव्याने तूर विक्रीसाठी आणण्याची संधी शेतकऱ्यांना मिळाली. तथापि, हे सर्व कागदोपत्रीच असल्याचे दिसत होते. अखेर नाफेडच्या खरेदीला पुन्हा सुरुवात झाली. त्यातच शनिवारी मालेगावात तूर मोजणी सुरू असताना अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. अशातच एका शेतकऱ्याची तूर पाण्याने थोडी ओली झाली. तेवढ्यावरूनच सदर तूर मोजून घेण्यास नाफेडच्या कर्मचाऱ्यांनी नकार दिला. त्यामुळे आधीच वैतागलेल्या त्या शेतकऱ्यासह इतरही शेतकऱ्यांचा पारा चढला आणि नाफेडचे कर्मचारी आणि शेतकऱ्यांत शाब्दिक चकमक झाली. त्यामुळे दुपारपासुनच येथील तूर मोजणी थांबली आणि रविवारीही या मोजणीला सुरुवात होऊ शकली नसल्याने शेतकऱ्यांना सोमवारपर्यंत प्रतिक्षा करावी लागणार आहे.  कोट: मालेगाव बाजार समितीत शेतकऱ्यांनी नाफेडवर विक्रीसाठी आणलेली तीन पोते तूर पावसात ओली झाली. ती मोजण्यावरून नाफेडचे कर्मचारी व शेतकऱ्यांत वाद झाल्याने तूर मोजणी बंद करावी लागली. सोमवारपासून पोलीस बंदोबस्तात तूर मोजणी केली जाईल. -प्रकाश कढणे सचिव  बाजार समिती मालेगाव