शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

विज जोडणीच्या तक्रारीची दखल जनता दरबारातही नाही

By admin | Updated: May 30, 2017 19:51 IST

वाशिम: वाशिम येथे आयोजित उर्जामंत्र्यांच्या जनता दरबारात रखडलेल्या विज जोडणीची तक्रार कारंजा तालुक्यातील सिरसोलीच्या शेतकऱ्याने केली; परंतु आता १२ दिवस उलटले तरी दखल घेण्यात आली नाही.

लोकमत न्यूज नेटवर्क

वाशिम: वाशिम येथे आयोजित उर्जामंत्र्यांच्या जनता दरबारात रखडलेल्या विज जोडणीची तक्रार कारंजा तालुक्यातील सिरसोलीच्या शेतकऱ्याने केली; परंतु आता १२ दिवस उलटले तरी, त्याची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे आता कोणाकडे जावे, असा प्रश्न शेतकऱ्यांकडे उपस्थित केला जात आहे. सिरसोली येथील शेतकरी प्रतिक तोंडे यांनी त्यांच्या शेतात कृषीपंपासाठी विज जोडणी मिळावी, म्हणून २९ एप्रिल २०१४ रोजी अर्थात तीन वर्षांपूर्वी विज वितरणकडे संपूर्ण कागदपत्रांसह अर्ज सादर केला, तसेच नियमानुसार अनामत रकमेचा भरणाही केला; परंतु तीन वर्षांपासून त्यांना विज जोडणी मिळालीच नाही. अशात १८ मे रोजी वाशिम येथे राज्याचे उर्जामंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांच्या उपस्थितीत जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले. त्यामध्ये प्रतिक तोंडे यांनी उर्जामंत्र्यांकडे निवेदन सादर केले; परंतु त्यानंतरही १२ दिवस उलटले तरी, त्यांना विज जोडणी मिळाली नाही. विज जोडणीचे काम करणारा कंत्राटदार शेतकऱ्याला अकारण येरझारा करण्यास विवश करीत आहे, असे असतानाही विज वितरण दखल घेत नसल्याने प्रतिक तोंडे यांनी पुन्हा राज्याचे उर्जामंत्री आणि विज वितरणच्या वरिष्ठांकडे तक्रार केली आहे.