शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

वृक्ष लागवडीविषयी चित्ररथाद्वारे जनजागृती

By admin | Updated: June 15, 2017 01:51 IST

जिल्हाधिकाऱ्यांनी दाखविली हिरवी झेंडी : मोहिमेत सहभागी व्हा!

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : ५० कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत १ ते ७ जुलै २०१७ या कालावधीत राज्यात चार कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. याबाबत जनजागृती करण्यासाठी वन विभागाने तयार केलेल्या चित्ररथाला १३ जून रोजी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी हिरवी झेंडी दाखविली.याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, अपर जिल्हाधिकारी डॉ. नंदकुमार बेडसे, उपवनसंरक्षक वि. ग. माने, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, रोहयोचे उपजिल्हाधिकारी सुनील कोरडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रकाश पाटील, जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल खंडागळे, सहायक वन संरक्षक आर. बी. गवई, सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी के. आर. राठोड, जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद कोपर्डे आदी उपस्थित होते.वाशिम जिल्ह्याला ५ लाख ८ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे. या अनुषंगाने ५ लाख २२ हजार वृक्ष लागवडीचे नियोजन करण्यात आले आहे.या अभियानात जास्तीत जास्त लोकसहभाग वाढविण्यासाठी वन विभागाच्यावतीने चित्ररथ तयार करण्यात आला आहे. २५ जूनपर्यंत हा चित्ररथ जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये जाणार असून, यासोबत असलेल्या कलापथकाच्या माध्यमातून झाडांचे महत्त्व पटवून दिले जाणार आहे. तसेच वृक्ष लागवड मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले जाणार आहे.वृक्ष लागवडीत सहभागी होणाऱ्या ग्रामपंचायतींचा होणार सन्मान५० कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत १ ते ७ जुलै २०१७ या कालावधीत राज्यात चार कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. या मोहिमेत सहभाग नोंदवून आपल्या आपल्या लोकसंख्येइतकी वृक्ष लागवड करणाऱ्या जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना स्वातंत्र्यदिनी सन्मानित करण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जास्तीत जास्त ग्रामपंचायतींनी यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.