शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

‘नाफेड’च्या बारदाना तुटवड्याचा प्रश्न अद्याप कायम!

By admin | Updated: April 3, 2017 02:23 IST

वाशिम जिल्ह्यात नाफेडची खरेदी १0 दिवसांपासून बंद

वाशिम, दि. २- पूर्वी साठवणुकीच्या अडचणीमुळे अडचणीत आलेली नाफेडची तूर खरेदी आता बारदान्याअभावी पूर्णपणे बंद पडली आहे. मागील १५ दिवसांपासून जिल्ह्यातील नाफेडची खरेदी बंद असून, आता मार्च एंडिंगच्या ताळेबंदासाठी बाजार समित्यांमधील व्यापार्‍यांची खरेदीही बंद ठेवण्यात आल्याने शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे.वाशिम जिल्ह्यात यंदा तुरीच्या पेर्‍यात वाढ झाली आणि उत्पादनही बर्‍यापैकी झाले. त्यामुळे बाजारात तुरीची आवक मोठय़ा प्रमाणात वाढली होती. तथापि, बाजारात हमीदराहून कमी दराने व्यापार्‍यांकडून तुरीची खरेदी होत असल्याने शेतकरी निराश असताना नाफेडने खरेदी सुरू केली. त्यामुळे शेतकर्‍यांना आधार मिळाला खरा; परंतु आठ-आठ दिवस बाजारात थांबूनही नाफेडच्या केंद्रावर शेतकर्‍यांच्या मालाची मोजणी होत नव्हती. त्यातच साठवणुकीसाठी जागा नसल्याने फेब्रुवारी महिन्यात काही दिवस खरेदी थांबली. वखार महामंडळाची गोदामे भरली आणि खासगी गोदामे भाड्याने मिळत नसल्याने अखेर वाशिम जिल्ह्यात खरेदी केलेली तूर अकोला येथील वखार महामंडळाच्या गोदामात साठवण्याच्या निर्णयानुसार खरेदी सुरू झाली. काही दिवस खरेदी झाली असतानाच आता बारदाना नसल्याने नाफेडची खरेदी बंद पडली आहे. मंगरुळपीर येथे फूड कॉर्पोरेशन ऑफइंडियाने, तर वाशिम, मालेगाव आणि कारंजा येथे महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनमार्फत नाफेडने १ लाख क्विंटलहून अधिक तुरीची खरेदी केली आहे. अद्यापही शेतकर्‍यांकडे लाखो क्विंटल तूर पडून आहे; परंतु व्यापार्‍यांसह नाफेडची खरेदीही बंद झाल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत.नाफेडकडून बारदाना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या संदर्भात त्यांच्या अधिकार्‍यांशी चर्चा करून बारदाना मागविण्यात येईल. तो सोमवारी मिळण्याचा विश्‍वास असल्याने आमची खरेदी सोमवारपासूनच करण्यात येईल. - मनोज बाजपेयी जिल्हा मार्केटिंग अधिकारी