शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
3
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
4
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
5
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
6
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
7
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
8
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
9
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
10
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
11
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
12
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
13
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
14
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
15
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
16
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
17
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
18
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
19
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
20
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

खासगी रुग्णालयांना ‘फायर ऑडिट’चा विसर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:43 IST

वाशिम : भंडारा येथील दुर्दैवी घटनेनंतर जिल्ह्यातील खासगी रुग्णालयांचा ‘फायर ऑडिट’चा प्रश्न ऐरणीवर आला असून, रविवारी ‘लोकमत’ने रिअ‍ॅलिटी चेक ...

वाशिम : भंडारा येथील दुर्दैवी घटनेनंतर जिल्ह्यातील खासगी रुग्णालयांचा ‘फायर ऑडिट’चा प्रश्न ऐरणीवर आला असून, रविवारी ‘लोकमत’ने रिअ‍ॅलिटी चेक केले असता गत दोन वर्षांपासून जवळपास ५५ टक्के खासगी रुग्णालयांनी ‘फायर ऑडिट’कडे पाठ फिरविल्याचे समोर आले.

भंडारा जिल्हा रुग्णालयातील नवजात शिशूंच्या अतिदक्षता कक्षाला शनिवार, ९ जानेवारी रोजी पहाटेच्या सुमारास लागलेल्या आगीत दहा अर्भकांचा वेदनादायी मृत्यू झाला. तीन नवजात होरपळून मरण पावले तर सात जणांचा गुदमरून अंत झाला. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील खासगी रुग्णालयांतील फायर ऑडिट व अग्निरोधक सिलिंडरची परिस्थिती नेमकी कशी आहे, यासंदर्भात रविवारी ‘रिअ‍ॅलिटी चेक’ केले असता जवळपास ४५ टक्के खासगी रुग्णालयांचे गत दोन वर्षांत ‘फायर ऑडिट’च झाले नसल्याचे समोर आले. जिल्ह्यात नोंदणीकृत २०० खासगी रुग्णालये आहेत. यामध्ये सर्वाधिक १२४ रुग्णालये वाशिम शहरातील आहेत. शॉट सर्किटमुळे आगीची घटना घडू नये म्हणून दरवर्षी फायर ऑडिट करणे अनिवार्य आहे. वाशिम शहरातील जवळपास ४९ रुग्णालयांचे फायर ऑडिट झाले नाही तसेच काही रुग्णालयांमधील अग्निरोधक सिलिंडर कालबाह्य असल्याचे समोर आले. अग्निरोधक सिलिंडरची नियमित पाहणी तसेच नियमित रिफिलिंग केले जात नसल्याचे दिसून आले. रिसोड शहरात जवळपास १८ नोंदणीकृत खासगी रुग्णालये असून, गत दोन वर्षांत एकाही रुग्णालयाचे फायर ऑडिट झाले नसल्याचे नगर परिषदेच्या अग्निशमन विभागाने स्पष्ट केले. मंगरूळपीर शहरातील खासगी रुग्णालयांमध्येही अशीच काहीशी परिस्थिती आहे. मालेगाव शहरातील नोंदणीकृत १० पैकी चार रुग्णालयांचे फायर ऑडिट झाले नसल्याची माहिती आहे. कारंजा शहरासह तालुक्यात नोंदणीकृत २५ खासगी रुग्णालये असून यापैकी जवळपास १३ रुग्णालयांमधील अग्निशमन यंत्रणा अद्ययावत नाही. अद्ययावत अग्निशमन यंत्रणा नसलेल्या जिल्ह्यातील खासगी रुग्णालयांमध्ये शॉट सर्किट किंवा अन्य कारणांमुळे आग लागल्यास यावर नियंत्रण कसे मिळविणार, हा महत्त्वाचा प्रश्न आहे.

००००००

खासगी रुग्णालयांमधील फायर ऑडिट व अग्निरोधक सिलिंडर याबाबत सविस्तर अहवाल मागविण्यात आला आहे. या विषयाच्या अनुषंगाने लवकरच जिल्हास्तरावर आढावा घेण्यात येणार आहे. फायर ऑडिट व अग्निरोधक सिलिंडर यासंदर्भात टाळाटाळ, दिरंगाई करणाऱ्याविरुद्ध शासन नियमानुसार योग्य ती कारवाई केली जाईल.

- शण्मुगराजन एस.

जिल्हाधिकारी, वाशिम

०००००

वाशिम शहरातील बहुतांश खासगी रुग्णालयांनी फायर ऑडिट केले आहे. आगीच्या संभाव्य घटना घडू नयेत तसेच आगीच्या घटनेवर नियंत्रण मिळावे म्हणून खासगी रुग्णालयांनी ‘फायर ऑडिट’ तातडीने करावे तसेच अग्निरोधक सिलिंडर व्यवस्था अद्ययावत ठेवावी, याबाबत डॉक्टरांशी चर्चा करण्यात आली आहे.

- डॉ. अनिल कावरखे,

जिल्हाध्यक्ष