शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

केवळ चार गावात वीजरोधक यंत्रे

By admin | Updated: June 7, 2014 01:16 IST

वाशिम जिल्ह्यात १0 वर्षात वीज पडून ७१ जणांचा मृत्यू ; सर्व गावात यंत्रे बसविण्याची गरज

सनत आहाळे / वाशिमपाऊस येण्याच्या वेळी आकाशात ढगांचा कडकडाट होऊन वीज पडण्याच्या अनेक घटना दरवर्षीच्या पावसाळयात घडतात. यापैकी काही घटनांमध्ये काही व्यक्ती जखमी होण्याच्या, तर प्रसंगी काही जणांचा मृत्यू होण्याच्याही घटना घडत असतात. वाशिम जिल्हय़ात मागील १0 वर्षात वीज पडून ७१ जण मृत्युमुखी पडले आहेत. वीज पडण्याला प्रतिबंध घालण्याचे काम वीजरोधक यंत्रे करतात; परंतु वाशिम जिल्हय़ात सद्य:स्थितीत केवळ चार गावांमध्येच वीजरोधक यंत्रे बसविली आहेत त्यामुळे जिल्हय़ात वीज पडून मृत्यू होण्याचे प्रमाण जास्त आहे. वीज पडण्याच्या घटना केवळ पावसाळय़ाच्या चार महिन्यातच होतात असे नव्हे, तर वर्षभरातील कोणत्याही महिन्यात होतात. हा सार्वत्रिक अनुभव आहे. फक्त पावसाळय़ाच्या प्रारंभी व शेवटच्या महिन्यात त्याचे प्रमाण अधिक असते. विशेषत: जून महिन्यात हे प्रमाण जास्त असते. सन २00४ पासून सन २0१३ पर्यंत मागील १0 वर्षात वीज पडण्याच्या घटनांमध्ये ७१ जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनांमध्ये सर्वाधिक १९ व्यक्तीचा मृत्यू जून महिन्यात वीज पडून झाला. सप्टेंबर महिन्यात १८ व्यक्तींचा, तर ऑक्टोबर महिन्यात ११ व्यक्तींचा मृत्यू झाला. जुलै महिन्यात ६, एप्रिल महिन्यात ५, ऑगस्ट महिन्यात ४, मार्च महिना व मे महिन्यात प्रत्येकी ३ तर जानेवारी व नोव्हेंबर महिन्यात प्रत्येकी एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. मागील १0 वर्षात डिसेंबर व फेब्रुवारी महिन्यात वीज पडून मृत्यू झाल्याची एकही घटना घडली नाही; परंतु याचा अर्थ या महिन्यात वीज पडण्याच्या घटना घडत नाहीत, असा नव्हे. वीज पडण्यास अटकाव करण्यासाठी वीजरोधक यंत्रे गावात बसविल्यास गावात वीज पडण्याचे टळू शकते. या दृष्टिकोनातून जिल्हय़ात प्रत्येक गावात वीजरोधक यंत्रे बसविल्यास वीज पडून होणारी मनुष्यहानी व पशुहानी बर्‍यापैकी टळू शकते. वाशिम जिल्हय़ात सद्य:स्थितीत वाशिम शहरात नगर पालिकेच्या आवारात वाशिम तालुक्यातील वारा जहागीर, मालेगाव तालुक्यात डव्हा येथे नाथनंगे महाराज संस्थानात व कारंजा तालुक्यात भुलोडा येथे अशा चार गावातच वीजरोधक यंत्रे बसविण्यात आलेली आहेत.