रिसोड तालुक्यातील मोठेगाव येथील सरपंचपद हे मागील कित्येक दिवसापासून रिक्त आहे. सदर सरपंचपद हे आरक्षण सोडतमध्ये अनुसूचित जमातीकरिता राखीव निघाले होते. परंतु या ग्रामपंचायतमध्ये एकूण ११ सदस्य आहेत. त्यापैकी एकही सदस्य अनुसूचित जमातीचा नसल्यामुळे हे पद मागील कित्येक दिवसापासून रिक्त आहे. हे पद रिक्त असल्यामुळे गावातील विकास कामे करीत असताना अडचणी निर्माण येत आहेत. त्यामुळे या सरपंचपदाची ग्रामपंचायत ११ सदस्य असलेल्यांपैकी निवडणूक घेऊन यापैकी सरपंचपदाची निवड करावी, अशी मागणी मोठेगाव ग्रामपंचायतच्या सर्व सदस्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. या अर्जावर गणेश पुंजाजी जाधव, ममता ज्ञानेश्वर जाधव, दीपाली गजानन कष्टे, शीला प्रकाशराव देशमुख, सुषमा सुशील धांडे या सदस्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. तरी याकडे लक्ष देऊन गाव विकासासाठी माेठेगाव येथील सरपंचपदाचा तिढा साेडविण्याची मागणी करण्यात आली आहे.
माेठेगाव येथील सरपंचपदाचा तिढा साेडवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:44 IST