शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

विद्युत पुरवठय़ाअभावी खरिपावर ओढवले संकट!

By admin | Updated: September 4, 2015 01:30 IST

बळीराजा हतबल; विविध प्रकारच्या किडींचाही पिकांवर विपरीत परिणाम.

वाशिम : पावसातील अनियमिततेमुळे यावर्षी खरीप हंगामातील सर्वच पिके बाधित झाली आहेत. असे असताना ज्या शेतकर्‍यांकडे सिंचनाची सोय आहे, त्यांना पुरेशी वीज मिळणे दुरापास्त झाले असून, विविध प्रकारच्या किडींमुळेही पिके नेस्तनाबूत होत असल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. जिल्ह्यात यंदा ४ लाख ७ हजार ९७ हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली आहे. सर्वाधिक पेरा सोयाबीनचा २ लाख ९0 हजार ९१ हेक्टरवर आहे. कपाशी ३0 हजार ८५७ हेक्टर, ज्वारी ८ हजार १९५ हेक्टर, तूर ५३ हजार ३९७ हेक्टर, मूग ११ हजार ६३७ हेक्टर, उडीद ११ हजार ८३२ हेक्टर असा खरिपातील प्रमुख पिकांचा पेरा आहे. यावर्षी मृग नक्षत्रातच पेरणीलायक झालेल्या पावसाने जुलै महिन्यात मात्र दडी मारली. त्यामुळे मूग, उडीद या पिकांना मोठा फटका बसला. जिल्ह्यातील काही शेतकर्‍यांकडे सिंचनाची सोय असल्याने ते ह्यस्प्रिंकलरह्णद्वारे पाणी देऊन पिके जगविण्याची केविलवाणी धडपड करीत आहेत; मात्र सलग ुवीजपुरवठा मिळणे कठीण झाल्याने शेतकर्‍यांचा हा प्रयोगही फसला आहे. अनेक शेतकर्‍यांनी शेतात जाणे सोडून दिले आहे. अनेक शेतात सोयाबीन डौलदार उभे दिसून येत असले तरी शेंगा न धरल्याने शेतकर्‍यांसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. पाणी आहे, विद्युत पुरवठा आहे पण विद्युतपुरवठा नियमित राहत नसल्याने शेतकर्‍यांची गत ह्यचणे आहेत, पण दात नाहीह्ण अशी झाली आहे.