शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

कुरघोडीचे राजकारण !

By admin | Updated: September 5, 2014 23:45 IST

कारंजा विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या इच्छुक उमेदवाराचे कुरघोडीचे राजकारण सुरू असल्याचे चित्र.

वाशिम : जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदार संघाकरीता होत असलेल्या निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार बाशिंग बांधून तयार असताना कारंजा विधानसभा मतदार संघात मात्र शिवसेनेतर्फे कोणत्याच प्रकारच्या हालचाली दिसून येत नव्हत्या. गत दोन दिवसांपासून अचानक शिवसेनेच्या इच्छुक उमेदवारांसह शिवसेनेतीलच दुखावलेल्या काहींनी कुरघोडीचे राजकारण सुरू केल्याचे चित्र आहे.वाशिम लोकसभा मतदार संघाचे नेतृत्व खा. भावना गवळी करताहेत. यांच्यावतिने इच्छुक असलेला उमेदवार काही जणांना पसंत नसावा किंवा आ पल्याला पक्ष डावलत आहे म्हणून काहींनी पक्षङ्म्रेष्ठीकडे फिल्डींग लावली आहे. तर काहींना आपल्या गटाचा उमेदवार पाहिजे असल्याने त्यांनी चक्क हायकमांडच्या भेटी घेण्या सुरू केल्या असून त्याचे छायाचित्र ह्यव्हॉटस अँपह्णवर सुध्दा टाकलेले आहेत. वाशिम जिल्हयातील तीन विधानसभा मतदार संघापैकी रिसोड व वाशिम विधानसभा मतदार संघ भाजपाकडे तर कारंजा विधानसभा मतदार संघ शिवसेनेकडे आहे. रिसोड विधानसभा मतदार संघात शिवसंग्रामच्यातिने प्रयत्न चालू आहेत याला काही शिवसैनिकांचे सहकार्य असल्याची चर्चा आहे. वाशिम विधानसभा मतदार संघात कुठेही शिवसेना निवडणुक लढविण्यास इच्छूक आहे किंवा तशी मागणी झालेली दिसून येत नाही. रिपाइं आठवले गटातर्फे मात्र यावेळीच्या निवडणुकीसाठी सोडण्याची जोरदार मागणी आहे. याकरीता येथील पदाधिकारी यांनी रिपाइंचे संस्थापक अध्यक्ष रामदास आठवले यांची भेट घेवून मतदार संघांचा संपूर्ण लेखाजोखा मांडला. रिपाइं चे पदाधिकारी यावेळी वाशिम विधानसभा मतदार संघ आम्हालाच सुटणार असल्याचे सांगत आहेत. शिवसेना मात्र ठरल्याप्रमाणे कारंजा विधानसभा मतदार संघात उमेदवार उभा करण्याच्या तयारीत असतांना अंतर्गत वादामुळे उमेदवारी कोणाला दिल्या जाईल हे सांगता येत नसले तरी कधीकाळी शिवसेनेत असलेले एक नेते तिकीट मिळावी यासाठी प्रयत्न करीत आहेत मात्र त्यांच्या मधात अनेक आठकाठी येत असल्याने ह्यतुले नाही तं मले नाहीह्ण असा पवित्रा त्यांनी घेतल्याचे राजकीय वतरुळात बोलल्या जात आहे. शिवसेनेच्यावतिने इच्छूक असलेल्या उमेदवारांमध्ये स्पर्धा लागल्याने आपल्यालाच तिकीट मिळावी याकरीता पुरेपूर प्रयत्न सुरू आहेत. मात्र जर आपल्याला तिकीट मिळत नाही याची कल्पना झालेल्यांनी अनेक दुसरे इच्छूक पुढे केले आहेत. त्यांची भेट सुध्दा पक्षङ्म्रेष्ठींशी घालून दिली आहे. या कुरघोडीच्या प्रकारामुळे शिवसेनेची कारंजा विधानसभा मतदार संघाची ितकीट कोणाला मिळेल हे सांगता येत नसले तरी कारंजा विधानसभा मतदार संघासह जिल्हयातील सर्व नागरिकांचे याकडे लक्ष लागलेले दिसून येत आहेत.*** कारंजा विधानसभा मतदार संघ शिवसेनेसाठी असल्याने सर्व हालचाली या मतदार संघात मोठया प्रमाणात होत आहेत. एकच मतदार संघ असल्याने इच्छुक उमेदवार एकमेकांवर कुरघोडी करीत पक्षङ्म्रेष्ठींची भेट घेवून आपली गार्‍हाणे व आपण कसे प्रबळ उमेदवार ठरू शकतो या संदर्भात चर्चा केल्या जात आहे. कारंजा विधानसभा उमेदवारीकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.