शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

‘उघड्यावर’ जाणार्‍या ५९0 जणांवर दंडात्मक कारवाई!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 01:13 IST

वाशिम: स्वच्छ भारत मिशन अंतर्गत वाशिम जिल्हा परिषदेच्यावतीने  बुधवार, ९ ऑगस्ट रोजी एकाच दिवशी जिल्ह्यातील निवडक २५५  गावांमध्ये ‘मेगा गुड मॉर्निंग’ मोहीम राबवून ‘खुले में शौच से  आजादी’, या जनजागृती अभियानास प्रारंभ करण्यात आला. 

ठळक मुद्दे२५५ गावांमध्ये धडक ‘खुले मे शौच से आझादी’ उपक्रमास प्रारंभ‘खुले मे शौच से आझादी’ उपक्रमास प्रारंभ

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: स्वच्छ भारत मिशन अंतर्गत वाशिम जिल्हा परिषदेच्यावतीने  बुधवार, ९ ऑगस्ट रोजी एकाच दिवशी जिल्ह्यातील निवडक २५५  गावांमध्ये ‘मेगा गुड मॉर्निंग’ मोहीम राबवून ‘खुले में शौच से  आजादी’, या जनजागृती अभियानास प्रारंभ करण्यात आला. या मोहिमेद्वारे एकाच दिवशी २५५ गावांमध्ये गुड मॉनिर्ंग पथक  धडकले आणि उघड्यावर जाणार्‍या तब्बल ५९0 लोकांना पकडून  दंडात्मक कारवाई करण्यात आली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी  अधिकारी गणेश पाटील यांच्या नेतृत्वात राबविण्यात आलेल्या या  विशेष मोहिमेने जिल्ह्यातील गावांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. मागील वर्षीच्या डिसेंबर महिन्याअखेर वाशिम जिल्हा परिषदेने  जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये एकाच दिवशी-एकाच वेळी गुड  मॉनिर्ंग पथकाची ‘एण्ट्री’ करून उघड्यावर  जाणार्‍यांविरूद्ध धडक  कारवाई केली होती. तेव्हा या उपक्रमाची सर्वत्र चांगलीच चर्चा झाली  होती. स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत जिल्हा हगणदरीमुक्त  करण्यासाठी  राबविण्यात येत असलेल्या अभिनव उपक्रमाने जिल्हा  ढवळून निघाला आहे. आता पुढील दोन महिन्यात जनजागृती मोहीम  अधिक तीव्र करण्यात येणार असल्याची माहिती स्वच्छ भारत  मिशनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुदाम इस्कापे यांनी दिली. दरम्यान, स्वच्छ भारत मिशनअंतर्गत कर्मचार्‍यांचे वेगवेगळे ‘गुड  मॉर्निंग’ पथक तयार करून बुधवारी भल्या पहाटे ते २५५ गावांमध्ये  शिरविण्यात आले. पथक गावात आल्याचे कळताच उघड्यावर  शौचविधी उरकणारी काही मंडळी परत घरी जाऊ लागली; तर काही  लोकांचा पाठलाग करून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात  आली.   जिल्हा परिषदेने राबविलेल्या या विशेष मोहीमेचे संनियंत्रण   इस्कापे यांच्यासह पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता नीलेश  राठोड यांनी केले. कारंजा तालुका आणि इतर पाच तालुक्यातील हगणदरीमुक्त गावे  वगळून उर्वरित २५५ ग्रामपंचायतीत ही मोहीम राबविण्यात आली. या  मोहिमेला यशस्वी करण्यासाठी जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनचे  सर्व सल्लागार, मिनी बीडीओ आणि तालुका स्वच्छता मिशनचे गट  समन्वयक  यांनी परिश्रम घेतले.