शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

तक्रारकर्त्यास नुकसानभरपाई द्यावी

By admin | Updated: September 1, 2015 01:41 IST

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंचचा आदेश.

वाशिम : जिल्हा परिषदेमध्ये अधिपरिचारिका म्हणून कार्यरत असताना राज्य शासनाच्या आरोग्य सेवेंतर्गत अकोला सर्कलमध्ये सामावून घेतल्यानंतर भविष्य निर्वाह निधीची रक्कम दोन लाख ९९ हजार ४९३ रुपयांचे चलान व धनादेश गहाळ करणार्‍या स्टेट बँक इंडियाने तक्रारकर्ती उषा सुरेंद्र वानखेडे यांना व्याजासह सेवेत कसुर केल्याबद्दल आठ हजार रुपये नुकसानभरपाई अदा करावी, असा आदेश जिल्हा ग्राहक निवारण न्याय मंचने २७ ऑगस्ट रोजी दिला. सप्तश्रृंगी अपार्टमेंट हिंगणा फाटा अकोला येथील उषा सुरेंद्र वानखेडे यांनी ३ जुलै २0१४ रोजी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंचकडे भारतीय स्टेट बँक शाखा वाशिम व जिल्हा आरोग्य अधिकारी जि.प. वाशिम यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली होती. या तक्रारीत उषा वानखेडे यांनी भविष्य निर्वाह निधीची रक्कम दोन लाख ९९ हजार ४९३ रुपयाचे चलान व धनादेश क्रं. १0१७१८ दि. २६ मे २0१0 ला भविष्य निर्वाह निधी खाते क्रमांक पीएचबीएन १९२३६ मध्ये जमा करण्याकरिता दिला होता; मात्र सदर चलान भारतीय स्टेट बँक शाखा वाशिम यांच्याकडून गहाळ झाल्यामुळे आ पणास ८.५ टक्के दराने ६१५२0 रुपये व्याज तसेच येण्या-जाण्याच्या खर्चाचे ८४८0 रुपये, आर्थिक व मानसिक त्रासाबद्दल २४ हजार रुपये देण्याचा आदेश व्हावा व तक्रारीचा खर्च पाच हजार रुपये विरुद्ध पक्षाकडून वसूल करुन आपणास मिळावे, असे नमूद केले होते. या प्रकरणी न्यायमंचच्या अध्यक्ष एस.एस. उंटवाले, सदस्य जे.जी.खांडेभराड व सदस्य ए.सी. उकळकर यांनी दोन्ही पक्षांची बाजू ऐकल्यानंतर भारतीय स्टेट बँकेने तक्रारकर्ते उषा वानखेडे यांना दोन लाख ९९ हजार ४९३ रुपयांवर ४ जून २0१0 ते २७ नोव्हेंबर २0१२ पर्यंतचे दरसाल दरशेकडा ८ टक्के दराने व्याज द्यावे. तसेच सेवेतील न्यूनतेपोटी नुकसानभरपाई व प्रकरणाचा न्यायिक खर्च मिळून रु पये आठ हजार द्यावे, असा आदेश दिला. तक्रारकर्त्यातर्फे अँड. मनोज वानरे व अँड.उंडाळ यांनी काम पाहिले.