सुनील काकडे / वाशिम : जिल्ह्यात दिवसेंदिवस झपाट्याने वाढत चाललेल्या रुग्णालयांमधून दैनंदिन जैव वैद्यकीय कचरा (बायोमेडिकल वेस्टेज) देखील मोठय़ा प्रमाणात निर्माण होत आहे. या कचर्याची विल्हेवाट लावण्याचा कंत्राट नगर परिषदांनी अमरावतीच्या एका खासगी एजन्सीकडे दिला आहे. यासाठी आकारले जाणारे शूल्क मात्र रूग्णांच्या शिखातून वसूल करण्यात येत आहे. जैव वैद्यकीय कचरा व्यवस्थापन व हाताळणी नियमात सन २000 मध्ये झालेल्या सुधारणेच्या अनुषंगाने हा कचरा गोळा करुन त्याची विल्हेवाट लावण्यासंदर्भात जिल्ह्यातील नगर परिषदांनी अमरावतीच्या कंपनीसोबत २0१४ मध्ये पुढील ३0 वर्षाचा करार केला आहे. त्यानुसार, १ ते ४ खाटांची क्षमता असणार्या दवाखान्यांकरिता ४६७.५0 रुपये प्रतिमहा ५ व त्यापेक्षा अधिक खाटांच्या रुग्णालयांकरिता ४.९५ रुपये प्रति खाट प्रतिदिन, पॅथॉलॉजी पदवीधारक व्यावसायिकांसाठी ६६0 रुपये प्रतिमहा, दंत वैद्यकीय व्यावसायिक ३८५ रुपये प्रतिमहा, गुरांचे दवाखाने ८६५ रुपये प्रतिमहा, क्लिनिक व डिस्पेन्सरी, डीएमएलटी, खासगी वैद्यकीय दवाखान्यांसाठी २७५ रुपये प्रतिमहा याप्रमाणे शुल्क आकारल्या जात आहे. अकोला येथील वैद्यकीय महाविद्यालयात जैविक कचरा जाळणारी दाहणी असून, पर्यावरण विभागाने परवानगी नाकारली आहे. त्यामुळे सदर दाहनी बंद आहे. परिणामी, हा कचरा जाळण्यासाठी वाशिम जिल्ह्यातील नगर परिषदांनी अमरावती येथील मे. ग्लोबल इको सेव सिस्टीम या एजन्सीला २0१४ मध्ये पुढील ३0 वर्षाकरिता करारबद्ध केले आहे. जिल्ह्यात सध्या एक जिल्हा सामान्य रुग्णालय, सात ग्रामीण रुग्णालय, २५ प्राथमिक आरोग्य केंद्र आणि १५0 प्राथमिक आरोग्य उपकेंद्र कार्यान्वित आहेत. याशिवाय १00 च्या आसपास मोठे आणि ३00 च्या आसपास छोट्या स्वरुपातील खासगी ह्यक्लिनिकह्णमधून रुग्णांवर उपचार केले जातात. या सर्व रूग्णांलयात रूग्णांकडूनच शुल्क उकळल्या जात आहे. जिल्ह्यात अनेक मोठय़ा रुग्णालयांसह छोट्या क्लिनिकच्या डॉक्टरांनी ह्यबायोमेडिकल वेस्टेजह्णची योग्य विल्हेवाट लावण्यासंदर्भात निष्काळजीपणा अंगीकारल्याने विविध समस्या उद्भवल्या आहेत.
जैव वैद्यकीय कचरा हटविण्याचा भुर्दंड रुग्णांना
By admin | Updated: September 25, 2015 01:24 IST