शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

पालकांनो सावधान, लहान मुलांना जडतोय दंतविकार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:45 IST

वाशिम : गोड खाद्यपदार्थांचे अतिसेवन, ब्रश नियमित न करणे, ‘क’ जीवनसत्त्वाचा अभाव आदी कारणांमुळे लहान मुलांमध्ये दात किडण्याचे प्रमाण ...

वाशिम : गोड खाद्यपदार्थांचे अतिसेवन, ब्रश नियमित न करणे, ‘क’ जीवनसत्त्वाचा अभाव आदी कारणांमुळे लहान मुलांमध्ये दात किडण्याचे प्रमाण वाढत असल्याचे तपासणीतून समोर येत आहे.

“दात चांगले तर आरोग्य चांगले,” असे म्हटले जाते. दातांची काळजी कशी घ्यावी याबाबत कुणीही फारसे जागरूक नसल्याने मुलांच्या दातांना कीड लागण्याचे प्रमाण वाढत आहे. चॉकलेट्स, गोड पदार्थ, चिप्स आणि जंकफूड अशा पदार्थांचे अधिक सेवन शरीरासाठी नुकसानकारक असते. या पदार्थांमुळे आजारांना निमंत्रण मिळते. तोंडावाटे अन्न शरीरात प्रवेश करते. त्यामुळे दात, जीभ, लाळग्रंथी हे तोंडातील अवयव अन्नाच्या अधिक संपर्कात येतात. या अवयवांची जितकी काळजी घेतली जाईल, तितके मुखआरोग्य चांगले राहते. गोड, चिकट व कडक पदार्थांमुळे दातांना हानी पोहोचण्याची शक्यता असते. गोड पदार्थांमधील शर्करा, अर्थात कार्बोहायड्रेट्स दात खराब करणाऱ्या जंतूंसाठी पोषक असतात. गोड पदार्थ खाल्न्ल्यानंतर कार्बोहायड्रेट्स पूर्णपणे स्वच्छ झाले नाहीत, तर दात किडण्यास प्रारंभ होतो. सकाळी उठल्यानंतर व रात्री झोपण्यापूर्वी दात स्वच्छ करणे, खाल्ल्यानंतर चूळ भरणे, दाताला हानिकारक असलेल्या पदार्थांचे सेवन नियंत्रणात ठेवणे या गोष्टी नियमित केल्या तर दातांचे रक्षण करता येईल, असा सल्ला दंतरोग तज्ज्ञांनी दिला. ३ ते १० वर्षे वयोगटातील बालकांचे दात किडण्याचे प्रमाण वाढत आहे. साधारणत: ७० टक्के बालकांच्या दातांना कीड लागत असल्याचे दंतरोग तज्ज्ञ सांगतात.

.................

अशी घ्यावी दातांची काळजी

तोंडातील जिवाणू गोड पदार्थांना आपला आहार म्हणून वापरतात, जिवाणू दातांवर हल्ला करून अम्लपदार्थ सोडतात. ज्यामुळे दात कमजोर बनतात व किडू लागतात.

लहान मुलांना गोड पदार्थ जास्त प्रमाणात खायला देणे टाळावे. कोणताही गोड खाद्यपदार्थ खाल्ल्यानंतर चूळ भरण्याची सवय बालकांना लावावी.

बालकांचा सकाळ व संध्याकाळ असा दोन वेळा नियमित ब्रश करून घ्यावा.

ब्रश काही महिन्यांनी बदलावा. हिरड्यांवरून हलक्या हाताने पेस्ट चोळून मसाज करावा. रक्ताभिसरण सुधारून दातावरील कीटक साफ होतात.

दातांच्या अस्वच्छतेमुळे होणाऱ्या आजाराला ‘पायरिया’ असे म्हटले जाते. तोंडाची दुर्गंधी, हिरड्यांमधून रक्त येणे, दात दुखणे, दात ठिसूळ होणे अशी या आजाराची लक्षणे आहेत.

00