शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
4
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
5
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
6
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
7
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
8
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
9
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
10
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
11
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
12
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
13
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
14
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
15
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
16
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
17
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
18
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
19
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
20
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
Daily Top 2Weekly Top 5

पार्डी ताडच्या ग्रामपंचायत सदस्यांना मिळाले मानधन

By admin | Updated: June 16, 2017 01:39 IST

प्रशासनाची दखल: ग्रामपंचायत सदस्यांनी व्यक्त केले समाधान

लोकमत न्यूज नेटवर्कपार्डी ताड : मंगरुळपीर तालुक्यातील पार्डी ताड ग्रामपंचायतचे सरपंच व ग्राम सदस्य मागील दोन वर्षांपासून मानधनापासून वंचित होते. यासंदर्भात ‘लोकमत’ने ११ जूनच्या अंकात ‘ग्रा.पंं. सदस्य दीड वर्षांपासून मानधनापासून वंचित’, या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केल्यानंतर गुरुवारी या ग्रामपंचायतच्या उपसरपंचासह सर्व सदस्यांना त्यांचे मानधन अदा करण्यात आले. पार्डी ताड ग्रामपंचायतची निवडणूक ४ आॅगस्ट २०१५ रोजी पार पडली. तेव्हापासून या ग्रामपंचायतचे सरपंच आणि सदस्यांचे मानधन व भत्ता अदा करण्यात आले नव्हते. यासंदर्भात सदस्य आणि सरपंचांनी ग्रामपंचायत सचिवांकडे वारंवार विषय उपस्थित करून मानधन अदा करण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी केली; परंतु त्याचा काहीच फायदा होऊ शकला नव्हता. विशेष म्हणजे या ग्रामपंचायतच्या माजी सदस्यांचेही मानधन अदा करण्यात आले नव्हते. शासनाने आधीच तुटपुंजे मानधन निश्चित केले असताना तेसुद्धा नियमित अदा होत नसल्याने ग्रामपंचायत सदस्यांत तीव्र नाराजीचे वातावरण आहे. एकीकडे आमदार आणि खासदार यांना दरवर्षी मासिक लाखो रुपये मानधन दिले जाते, तसेच त्यांना मासिक पेन्शनसह इतरही सुविधा दिल्या जात असताना ग्रामपंचायत सदस्यांना मात्र २५ रुपये भत्ता दिल्या जातो. केवळ २५ रुपये भत्ता हा खूप कमी असल्यामुळे ग्रामपंचायतच्या मासिक सभेला ग्रामपंचायत सदस्यांची उपस्थिती फारच कमी असते. त्यामुळे ग्रामपंचायत मासिक सभेमध्ये गाव विकासाबाबत योग्य ठराव घेणे शक्य होत नाही. त्यामुळे गावाचा विकास होत नाही. सद्यस्थितीत मजुरांना दोनशे रुपये मजुरी मिळते, तर ग्रामपंचायत सदस्यांना तीनशे रुपये भत्ता असावा, अशी मागणी होत आहे. पार्डीताड येथील ग्रामपंचायतच्या सदस्यांना गेल्या २२ महिन्यांपासून भत्ता व सरपंचाचे मानधन प्राप्त झाले नव्हते, तसेच माजी सदस्यांचाही भत्ता थकीत होता. यासंदर्भात मंगरुळपीर पंचायत समितीमधील संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून वस्तुस्थिती जाणून घेतली. त्यावेळी फेब्रुवारी २०१७ पर्यंतचे ग्रामपंचायत कर्मचारी सरपंचचे मानधन, तसेच ग्रामपंचायत सदस्यांचा भत्ता ग्रामपंचायतकडे दिला असल्याची माहिती त्यांच्याकडून देण्यात आली. लोकमतने यासंदर्भात ११ जूनच्या अंकात वृत्त प्रकाशित करून त्यांची समस्या मांडली. ग्रामपंचायत सचिवांनी दखल घेऊन आजी, माजी सदस्यांसह सरपंच, उपसरपंचांचे मानधन गुरुवारी अदा केले. या ग्रामपंचायतच्या सातही सदस्यांना २५ रुपये मासिक भत्त्याप्रमाणे प्रत्येकी ४५० रुपये, तर उपसरपंचांना ४५० रुपये मानधन प्रमाणे १८ महिन्यांचे ७ हजार ११० रुपये अदा केले. दरम्यान, पार्डी ताडनजिकच्या कंझरा येथील ग्रामपंचायत सदस्यांचे मानधनही थकलेले होते. याचा उल्लेख लोकमतच्या वृत्तात करण्यात आला होता. या ग्रामपंचायतच्या सदस्यांनाही त्यांचे थकीत मानधन अदा करण्यात आले आहे. त्यामुळे ग्रामपंचायत सदस्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.