शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

पांगरी (महादेव) गाव भोगतेय ‘मरण यातना’!

By admin | Updated: September 28, 2016 01:32 IST

अकोला, वाशिम या दोन्ही जिल्ह्यातून हद्दपार; त-हाळा ग्रामपंचायतीने नाकारले पालकत्व.

साहेबराव राठोडमंगरूळपीर(जि. वाशिम), दि. २७- देशाला स्वातंत्र्य मिळून ६९ वर्षे पूर्ण झाली; मात्र आजही दुर्गम भागातील खेड्यांचा पूर्णत: विकास झालेला नाही. अशाच गावांमधील एक असलेले पांगरी (महादेव) हे गाव तर मरण यातना भोगत आहे. ८00 च्या आसपास लोकसंख्या असलेल्या या गावाला अकोला आणि वाशिम या दोन्ही जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले असून, नजिकच्या तर्‍हाळा ग्रामपंचायतीनेही गावाचे पालकत्व नाकारले आहे. परिणामी, या गावातील रहिवाश्यांना विकासापासून वंचित राहावे लागत आहे. सन २00३ साली अकोला जिल्ह्यातून वाशिम जिल्ह्यात समावेश झालेल्या पांगरी (महादेव) या गावाची अवस्था आजमितीस अत्यंत दयनिय झाली आहे. जेव्हापासून या गावाचा समावेश वाशिम जिल्ह्यात झाला, तेव्हापासूनच स्वतंत्र ग्रामपंचायतीचा दर्जा तर मिळाला नाहीच; परंतु नजीकच्या कुठल्याच ग्रामपंचायतने या गावाला आपलेसे केले नाही. परिणामी, संपूर्ण गावकर्‍यांना मूलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. म्हणायला, जिल्हा परिषद शाळा, विद्युत वितरण व्यवस्था, अंगणवाडी आदींचा कारभार अकोला जिल्ह्यातून सुरू आहे; मात्र शासनस्तरावरून पुरविल्या जाणार्‍या वैयक्तिक योजनांचा लाभ एकाही गावकर्‍याला मिळत नसल्याचे वास्तव आहे. पांगरी ग्रामवासीयांचे हे दुखणे निवारण्यासाठी लोकप्रतिनिधी तथा जिल्हा प्रशासन कुठल्याच प्रकारचे ठोस पाऊल उचलत नसल्याचे दिसून येत आहे. मध्यंतरी या गावाचा कारभार नजीकच्या तर्‍हाळा ग्रामपंचायतीमधून पाहिला जायचा; मात्र त्या ग्रामपंचायतीनेही यापुढे पांगरीच्या पालकत्वाची जबाबदारी सांभाळण्यास नकार दर्शविणारा ठराव घेतल्याची माहिती आहे. तथापि, चोहोबाजूंनी निराधार झालेल्या पांगरी ग्रामवासीयांना न्याय देण्यासाठी प्रशासनाने ठोस पाऊल उचलण्याची नितांत गरज निर्माण झाली आहे. घरकुल लाभासाठी कागदपत्रच मिळेना!संपूर्ण वाशिम जिल्ह्यात सध्या ह्यसर्वांसाठी घरेह्ण, या उपक्रमांतर्गत घरकुलांकरिता अर्ज मागविण्यात येत आहेत. यासाठी घरकुल उभारण्यासाठी स्वत:कडे पुरेशी जागा असल्याबाबत ग्रामसचिवाचा दाखला, नमुना आठ ह्यअह्ण आणि ग्रामपंचायत पदाधिकार्‍याचा दाखला, आदी कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे; मात्र पांगरी (महादेव) या गावाला कुठल्याच गटग्रामपंचायत अथवा ग्रामपंचायतीचा आधार नसल्यामुळे हे कागदपत्रे मिळणे कठीण झाले आहे. परिणामी, शासनाच्या या महत्त्वाकांक्षी योजनेपासून वंचित राहावे लागत असल्याची खंत गावकर्‍यांनी व्यक्त केली.