शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

सेंद्रिय पद्धतीच्या शेतमाल उत्पन्नाचे प्रमाण नगण्य!

By admin | Updated: May 11, 2017 06:59 IST

१८ शेतकरी गट पूर्णत: सक्रिय करण्यात ‘आत्मा’ला (कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा) अद्याप यश मिळालेले नाही.

सुनील काकडे वाशिम : राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत गत वर्षभरात जिल्ह्यात ३६४ हेक्टरवर स्थापन झालेले १८ शेतकरी गट पूर्णत: सक्रिय करण्यात "आत्मा"ला (कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा) अद्याप यश मिळालेले नाही. परिणामी, जिल्ह्यात सेंद्रिय पद्धतीने पिकविल्या जाणाऱ्या शेतमाल उत्पन्नाचे प्रमाण आजही नगण्य असल्याची माहिती सूत्रांनी बुधवारी दिली. केंद्र शासनाच्या राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानातून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात सेंद्रिय शेतीचे क्षेत्र वाढविण्यावर भर देण्याचे शासनाचे निर्देश आहेत. त्यानुसार, ह्यआत्माह्ण अंतर्गत २०१६-१७ च्या खरीप हंगामापासून प्रत्येक जिल्ह्यात गटनिहाय शेतकऱ्यांची निवड करून त्यांना सेंद्रिय पद्धतीने अन्नधान्य, फळे, भाजीपाला पिकविण्यासाठी प्रोत्साहित करणे, त्यासाठी लागणारे मार्गदर्शन, प्रशिक्षण त्यांना देणे क्रमप्राप्त आहे. त्यानुसार, वाशिम जिल्ह्यात ह्यआत्माह्णअंतर्गत वाशिम, मंगरूळपीर, कारंजा, मानोरा, रिसोड आणि मालेगाव या सहा तालुक्यांमध्ये प्रत्येकी ५० शेतकऱ्यांचे तीन याप्रमाणे १८ गट स्थापन झाले आहेत. या माध्यमातून ९०० एकर अर्थात ३६४ हेक्टरवर सेंद्रिय शेती फुलायला हवी होती. मात्र, बोटावर मोजण्याइतपत शेतकऱ्यांचा अपवाद वगळल्यास विविध स्वरूपातील अडचणींमुळे सेंद्रिय शेतीला जिल्ह्यात अद्याप चालना मिळालेली नाही. विशेष गंभीर बाब म्हणजे सद्यस्थितीत या अभियानात सहभागी एकाही शेतकऱ्याच्या शेतात सेंद्रिय पद्धतीने कुठल्याच प्रकारचे उत्पादन काढणे सुरू नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे राष्ट्रीय शेती शाश्वत अभियानाचा मूळ उद्देश बहुतांशी असफल ठरल्याचे सिद्ध होत आहे.        शेतीतून अधिक उत्पन्न घेण्याच्या हव्यासापायी रासायनिक खतांचा वापर मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे. यामुळे मात्र शेतीच आरोग्य धोक्यात सापडले असून, ते टिकवून ठेवण्यासाठी वेळोवेळी शेतातील माती आणि पाण्याचे परीक्षण करणे आवश्यक आहे. असे असताना वाशिम जिल्ह्यात अद्याप माती परीक्षणासाठी शासकीय प्रयोगशाळा उभी राहू शकलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना आजही माती परीक्षणासाठी पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला अथवा करडा (ता. रिसोड) येथील कृषी विज्ञान केंद्रावरच विसंबून राहावे लागत आहे. जिल्ह्याला मृद सर्वेक्षण, मृद चाचणी प्रयोगशाळा मंजूर झाली. यासाठी लागणारा निधी आणि साहित्यदेखील मिळाले असताना प्रयोगशाळा अद्याप सुरू होऊ शकली नाही.       शाश्वत शेती अभियानांतर्गत निवड करण्यात आलेल्या शेतकऱ्यांना सेंद्रिय खत कसे तयार करायचे, याचे प्रशिक्षण देण्याची तरतूद आहे. मात्र, त्याची प्रशासकीय पातळीवरून अंमलबजावणी केली जात नाही. शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातच निंबोळी अर्क तयार करणे, दशपर्णी, जीवामृत तयार करण्याचे प्रात्यक्षिक ह्यआत्माह्णच्या माध्यमातून व्हायला हवे. याशिवाय माती परीक्षण, पाणी परीक्षणाची गरज आणि त्याचे महत्त्व याअंतर्गत शेतकऱ्यांना पटवून द्यायला हवे; परंतु असे कुठलेच उपक्रम "आत्मा" अंतर्गत सुरू नाहीत. त्यामुळे शेतकरी संभ्रमात आहेत.- रवी मारशेटवारशेतकरी, वाशिम