शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

वत्सगुल्म शाळेच्या खोल्या पाडण्याचे आदेश

By admin | Updated: January 15, 2015 00:28 IST

जिल्हाधिका-यांचे पत्र; नगर परिषदेच्या भूमिकेकडे लक्ष.

धनंजय कपाले / वाशिम:  येथील वत्सगुल्म सेवा समिती द्वारा संचालीत वत्सगुल्म प्राथमिक शाळेची इमारत ही सद्यस्थितित आययूडीपी कॉलनीमध्ये उभी आहे. या इमारतीच्या दोन खोल्यांचे बांधकाम चक्क नाल्यामध्ये केल्याने सदर बांधकाम तत्काळ काढण्याचे आदेश ८ जानेवारी रोजी नगर परिषदेच्या मुख्याधिकार्‍यांना देण्यात आले आहेत. आठ दिवस उलटूनही जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशावर अंमलबजावणी न झाल्याने नगर परिषद प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे. वत्सगुल्म सेवा समिती वाशिम द्वारा संचालीत वत्सगुल्म प्राथमिक शाळा ही सन १९९४ पासून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात सुरू आहे. दोन वर्षांपूवी शाळा समितीच्या व्यवस्थापनाने सदर शाळा ही शिक्षण विभागाची परवानगी न घेता आययूडीपी कॉलनीमध्ये स्थलांतरित केली. नियमानुसार शाळा स्थानांतरणासाठी शिक्षण उपसंचालक यांच्या परवानगीची आवश्यकता असते; मात्र शाळा व्यवस्थापनाने केवळ स्थलांतरणाचा प्रस्ताव सादर करून विनापरवानगीने स्थलांतरण केल्याचा ठपका गटशिक्षणाधिकार्‍यांनी ३१ डिसेंबर २0१४ च्या अहवालामध्ये ठेवला आहे. नवीन ठिकाणी स्थलांतरित केलेल्या शाळा इमारतीचे बांधकाम करण्यासाठी नगर रचना प्रशासनाने ३0 एप्रिल २0१२ रोजी बांधकामास परवानगी दिली होती. या परवानगीमध्ये स्पष्ट उल्लेख आहे की, जागेच्या उत्तर बाजूने नाला असल्याने नाल्यापासून सहा मीटर अंतर सोडून इमारतीचे बांधकाम करावे; परंतु वत्सगुल्म सेवा समितीने नाल्यामध्ये कॉलम टाकून दोन खोल्यांचे बांधकाम केल्याचे राष्ट्रवादी मागासवर्गीय सेलचे जिल्हाध्यक्ष आशीष राऊत यांनी जिल्हाधिकार्‍यांच्या निदर्शनास आणून दिले. राऊत यांनी शाळा इमारतीच्या अनधिकृत बांधकामाबाबत, विनापरवानगीने केलेल्या स्थलांतराबाबत व नगर परिषदेने ३0 वर्षाऐवजी ९0 वर्षाचा भाडेपट्टा करून दिल्याबाबतचे सबळ पुरावे जिल्हाधिकार्‍यांना दिले होते. राऊत यांच्या तक्रार अर्जाची दखल घेऊन वत्सगुल्म समितीने केलेले अनाधिकृत व अनियमित बांधकाम तत्काळ काढून टाकण्यासंबंधी जिल्हाधिकार्‍यांनी सुचना दिल्या. त्याबाबतचा अहवाल जिल्हाधिकार्‍यांनी नगर परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना ८ जानेवारी रोजी मागितला आहे; परंतु आठ दिवस उलटूनही शाळा खोल्यांचे बांधकाम काढण्यात न आल्याने नगर परिषदेच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.