शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

चार वर्षात केवळ पाच माता-पित्यांच्या तक्रारी

By admin | Updated: January 11, 2015 00:28 IST

ज्येष्ठ नागरिक निर्वाह न्यायाधिकरण; कारंजा व मंगरूळपीर उपविभागात एकही तक्रार नाही.

संतोष वानखडे / वाशिमवृद्धापकाळात आई-वडिलांचा सांभाळ करण्यास किंवा उदरनिर्वाहासाठी निर्वाह भत्ता देण्यास नकार देणार्‍या मुलांच्या मुजोरीला वेसण घालण्यासाठी शासनाने ज्येष्ठ नागरिक निर्वाह न्यायाधिकरण २0१0 मध्ये स्थापन केले आहे. गत चार वर्षात जिल्हय़ात केवळ पाच वृद्ध माता-पित्यांनी आपल्या बंडखोर अपत्यांविरुद्ध या न्यायाधिकरणाकडे दाद मागितल्याची माहिती हाती आली आहे. या पाचही प्रकरणांचा ह्यनिकालह्ण तातडीने लावण्याची तत्परता वाशिम उपविभागाने दाखविली आहे.वृद्धापकाळात आई-वडिलांचा सांभाळ करण्यास किंवा उदरनिर्वाहासाठी निर्वाह भत्ता देण्यास नकार देणार्‍या, आई-वडिलांना वार्‍यावर सोडणार्‍या मुलांच्या मुजोरीला वेसण घालण्यासाठी शासनाने एक अधिनियम पारित केला. आई-वडील व ज्येष्ठ नागरिक यांच्या चरितार्थ व कल्याणासाठी अधिनियम - २00७ व व २0१0 च्या नियमाने ज्येष्ठ नागरिक व जन्मदात्याचे पालनपोषण करण्याची जबाबदारी वारस किंवा अपत्यांवर सोपविली आहे. वृद्धापकाळात सांभाळ करण्यास नकार दिल्यास किंवा उदरनिर्वाहासाठी दरमहा निर्वाह भत्ता न दिल्यास ज्येष्ठ नागरिकांना या ज्येष्ठ नागरिक निर्वाह न्यायाधिकरणाकडे दाद मागता येते. तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेल्या मुलांकडूनच आयुष्याच्या निर्णायक टप्प्यात अनेक आई-वडिलांच्या वाट्याला हाल अपेष्टा येतात. आई-वडिलच अडगळ वाटू लागल्याने त्यांची देखभाल न करणे, त्यांचा तिरस्कार करणे याबरोबरच त्यांना घराबाहेर काढण्यापर्यंतही काहींची मजल जाते. न्यायाधिकरण वृद्धापकाळात आई-वडिलांना वार्‍यावर सोडणार्‍या बेजबाबदार मुलांना वेळप्रसंगी तुरुंगातही खडी फोडायला पाठवू शकते. ज्येष्ठ नागरिक अथवा आई-वडिलांनी तक्रार अर्ज दिल्यास हे न्यायाधिकरण मुले किंवा त्यांचा सांभाळ करणार्‍या नातेवाइकांना बोलावून घेते. जिल्ह्यात वाशिम उपविभागाचा अपवाद वगळता कारंजा व मंगरुळपीर उपविभागात अशा प्रकारची एकही तक्रार उपविभागीय अधिकार्‍यांकडे आलेली नाही. वाशिम उपविभागाच्या न्यायाधिकरणात २0१४ या वर्षात एकूण पाच तक्रारी आल्या होत्या. न्यायाधिकरणाचे अध्यक्ष तथा उपविभागीय अधिकारी अशोक अमनकार यांनी तातडीने या पाचही प्रकरणांचा निकाल देत बेजबाबदार मुलांना दोषी धरले आहे. माता-पित्यांना उदरनिर्वाहासाठी दरमहा निर्वाह भत्ता देण्याचे आदेश अमनकार यांनी दिले आहेत.