शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
3
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
4
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
5
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
6
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
7
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
8
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
9
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
10
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
11
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
12
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
13
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
14
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
15
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
16
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
17
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
18
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
19
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
20
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

शिरपूरच्या अडोळ प्रकल्पात केवळ ४0 टक्के जलसाठा!

By admin | Updated: September 20, 2016 01:10 IST

रब्बी हंगामावर संकट; रिसोड व शिरपूरसाठी पाणी ठेवले जाणार राखून.

शिरपूर जैन (जि. वाशिम), दि. १९- यंदा दमदार स्वरूपात झालेल्या पावसामुळे जिल्हय़ातील बहुतांश धरणांनी १00 टक्क्यांची पातळी ओलांडली आहे. दुसरीकडे सिंचनाकरिता पाणी राखून ठेवत रिसोड आणि शिरपूर जैनला ज्या अडोळ प्रकल्पावरून पाणीपुरवठा केला जातो, त्यात आजमितीस केवळ ४0 टक्के पाणीसाठा झाला आहे. आगामी काही दिवसांत मोठा पाऊस होऊन धरण न भरल्यास भविष्यात सिंचनाच्या प्रश्नासोबतच पिण्याच्या पाण्याचा प्रश्नदेखील गंभीर होणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. शिरपूरपासून १0 किलोमीटर अंतरावर अडोळ प्रकल्प वसलेला आहे. या प्रकल्पातून वाघी, बोराळा, खंडाळा, पार्डी, रिठद, येवती, ढोरखेडा यासह इतर गावातील शेतकर्‍यांना सिंचनासाठी पाणी दिले जाते. सोबतच रिसोड आणि शिरपूर या दोन गावांना पिण्यासाठी पाणी पुरविले जाते. यावर्षी जिल्हय़ात सर्वदूर मोठय़ा प्रमाणात पाऊस कोसळला; मात्र शिरपूर, करंजी, शेलगाव, शिरसाळा, खंडाळा या अडोळ परिसरातील गावामध्ये पावसाचे प्रमाण अत्यंत कमी राहिले. शिरपूर येथे केवळ ४७२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. परिणामी, प्रकल्पामधील पाणीसाठय़ात योग्य प्रमाणात वाढ होऊ शकली नाही. त्यामुळे आज रोजी प्रकल्पात केवळ ४0 टक्के जलसाठय़ाची नोंद आहे. इतक्या कमी प्रमाणात प्रकल्पात जलसाठा असून येत्या काही दिवसात परतीचा पाऊस न झाल्यास परिसरातील शेतकर्‍यांचा रब्बी हंगाम निश्‍चितपणे धोक्यात येऊ शकतो. तसेच प्रकल्पातून रिसोड व शिरपूर शहराला पाणीपुरवठा करण्यात येत असतो, त्यावरही बहुतांशी परिणाम होण्याचे संकेत आहेत.