शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
6
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
7
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
8
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
9
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
10
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
11
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
12
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
13
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
14
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
15
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
16
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
17
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
18
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
19
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
20
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
Daily Top 2Weekly Top 5

‘ऑनलाइन’ फेरफार पद्धत ठरतेय ‘डोकेदुखी’!

By admin | Updated: November 7, 2016 02:47 IST

‘सर्व्हर’मधील बिघाडामुळे झाला नित्याचाच; तलाठय़ांना अद्ययावत प्रशिक्षणाची गरज; शेतकरी त्रस्त!

शिखरचंद बागरेचा वाशिम, दि. ६- कामात अधिक सुसूत्रता यावी, गरजूंना वेळेत संगणकीकृत कागदपत्रे मिळावीत, या उद्देशाने हस्तलिखितऐवजी ऑॅनलाइन फेरफार नोंद पद्धत लागू करण्यात आली; मात्र ही पद्धत फायदेशीर ठरण्याऐवजी डोकेदुखी वाढविणारी ठरली आहे. ई-फेरफार नोंद निर्णयांतर्गत सुरुवातीला संगणकीकृत ७/१२, ८ अ यासह शेतीसंदर्भातील अन्य कागदपत्रे देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे तलाठी कार्यालयांमध्ये मिळणार्‍या या कागदपत्रांसाठी शेतकर्‍यांना दिवसभरातील शेतीची कामे सोडून तसेच पदरमोड करून तहसील कार्यालय गाठावे लागते. सेतू केंद्रात ठरावीक दिवशी कागदपत्रे मिळाली नाही, तर दुसर्‍या दिवशी जावे लागते. यामध्ये शेतकर्‍यांचा वेळ व पैशांचा अपव्यय होण्यासोबतच त्यांना नाहक मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. ई-फेरफार नोंदी अंतर्गत कागदपत्रे देण्याकरिता महसूल विभागाची सर्व कार्यालये ब्रॉडबॅन्ड इंटरनेटने जोडण्यात आली आहेत; मात्र एकाच वेळी अनेक सेतू केंद्रांमध्ये सुरू राहणार्‍या कामांमुळे ह्यसर्व्हरह्णमध्ये दोष उद्भवून कामात व्यत्यय निर्माण होणे, नेट कनेक्टिव्हिटी न मिळणे, यासह इतर तांत्रिक कारणांमुळे सदर कागदपत्रे मिळविण्यासाठी शेतकर्‍यांना तसेच ती देण्यासाठी संबंधित कर्मचार्‍यांना विविध प्रकारच्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. कधी वेबपेज खुलत नाही; तर कधी अपलोड व डाऊनलोड करण्यासाठी अडचणी येतात. त्यामुळे आधी उद्भवणार्‍या तांत्रिक अडचणी दूर करा नंतर सदर निर्णयाची अंमलबाजवणी करा, अशी मागणी संतप्त शेतकर्‍यांमधून होत आहे.