शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
5
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
6
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
7
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
8
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
9
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
10
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
11
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
12
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
13
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
14
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
15
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
16
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
17
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
18
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
19
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
20
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

एक कोटी रुपयांचा संत्रा दलालाने विकला परस्पर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:35 IST

कोरोना विषाणू संसर्गाचे संकट उद‌्भवण्यापूर्वी वाशिम जिल्ह्यातील मुंगळा (ता. मालेगाव) येथील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी दलालाच्या माध्यमातून हैदराबाद येथील कोल्ड ...

कोरोना विषाणू संसर्गाचे संकट उद‌्भवण्यापूर्वी वाशिम जिल्ह्यातील मुंगळा (ता. मालेगाव) येथील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी दलालाच्या माध्यमातून हैदराबाद येथील कोल्ड स्टोरेजमध्ये २० हजार ८७७ क्रेटमध्ये ४६८९.६३ क्विंटल आणि वडोदरा (गुजरात) येथील कोल्ड स्टोरेजमध्ये ६५० क्रेटमध्ये १४३ क्विंटल संत्रा साठवून ठेवला होता. मार्च महिन्यातील शेवटच्या आठवड्यात कोल्ड स्टोरेजमधून संत्रा काढून तो विक्री करण्याचे नियोजन संबंधित शेतकऱ्यांचे होते; मात्र २५ मार्चपासून देशभरात लॉकडाऊन जाहीर झाल्याने संत्रा कोल्ड स्टोरेजमध्येच अडकून पडला.

कालांतराने कोरोना संकटाची परिस्थिती निवळल्यानंतर शेतकऱ्यांनी संबंधित दलालाकडे संत्र्याची मागणी केली असता, तो मिळाला नाही. याप्रकरणी मुंगळा येथील लक्ष्मण राऊत, महादा राऊत, संतोष मनोहर राऊत, संतोष केळे, संतोष बबन राऊत आणि मोतीराम सोनुने या शेतकऱ्यांनी मालेगाव पोलिसांत तक्रार दाखल करून संबंधित दलालाविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली; परंतु तीन महिने उलटूनही पोलिसांनी कुठलीच विशेष हालचाल केलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमधून रोष व्यक्त होत आहे

................................

बॉक्स :

हैदराबादच्या पोलीस ठाण्यातही तक्रार

मुंगळा येथील शेतकऱ्यांनी मालेगाव पोलीस ठाण्यासोबतच हैदराबाद येथील ठाण्यातही एक कोटी रुपये किमतीचा संत्रा परस्पर विकणाऱ्या दलालावर कारवाई करण्यासाठी तक्रार दाखल केलेली आहे. असे असले तरी संबंधित दलालावर अद्यापपर्यंत कुठलीही कारवाई झालेली नाही, असे तक्रारकर्ते शेतकरी महादा राऊत यांनी सांगितले.

..........................

कोट :

शेतात अहोरात्र कष्ट करून पिकविलेला संत्रा सुरक्षित राहावा आणि चांगला दर मिळून फायदा व्हावा, या उद्देशाने हैदराबादच्या कोल्ड स्टोरेजमध्ये साठवून ठेवला होता; मात्र तो संबंधित दलालाने परस्पर विकला. याप्रकरणी तीन महिन्यांपूर्वी मालेगाव पोलिसांत तक्रार दाखल करूनही न्याय मिळालेला नाही.

- संतोष गजानन केळे

संत्रा उत्पादक शेतकरी, मुंगळा