शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

पसरणीचे उपसरपंच हत्या प्रकरणी एका आरोपीला अटक

By admin | Updated: May 18, 2017 14:35 IST

या इसमाला रात्री १ वाजताच्या दरम्यान अटक करून त्यांची कसून चौकशी सुरू आहे.

कारंजा लाड -  कारंजा तालुक्यातील ग्राम पसरणी येथील ग्राम पंचायतचे उपसरपंच विलास पोटपिटे याची दादगाव शेतशिवारात ५ एप्रिल रोजी हत्या झाली होती. हत्या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपी विरूध्द गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध घेण्यासाठी तपास मोहीम जोरात सुरू केली असून पोटपिटे यांच्या सोबत संबध असणा-या सर्व संबधिताची कसून चौकशी सुरू आहे. लवकरच आरोपी पोलीसांच्या ताब्यात येईल असा विश्वास पोलीसांनी दाखविला. हत्या प्रकरणी कारंजा पोलीसांनी पसरणी येथील महेबुब मदन चौधरी वय ३२ या इसमाला दि. १७ मे च्या रात्री १ वाजताच्या दरम्यान अटक करून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. या अटकेमुळे आणखी तिन ते चार आरोपी अटक होण्याची शक्यता पोलीसाकडून वर्तविण्यात येत आहे.  पसरणी येथील उपसरपंच विलास मारोती पोटपिटे वय ३८ हे विहिरचे बांधकाम करण्याचा व्यवसाय करीत होते. ५ एप्रिल रोजी त्याच कामानिमित्त सांयकाळी ५ वाजता निघून गेले. दरम्यान पोटपिटे यांचा मृतदेह ५ एप्रिल रोजी दादगाव शेतशिवारात असल्याची माहीती दादगाव येथील पोलीस पाटील यांनी ठाणेदार राजेंद्र पाटील यांना दिली. यावेळी पोलीस कर्मचारी घटनास्थळी रवाना झाले. दादगाव रोडवर एम.उच ३७ एम ८५९० या क्रमांकाची पॅशनप्रो ही मयताची दुचाकी उभी असल्याचे दिसून आले तर मयत पोटपिटे याचा मृतदेह गळयात दुपटटा बांधलेल्या अवस्थेत रोड पासून काही अंतरावर असलेल्या बाभूळवनात आढळयाने घातपात झाल्याचे निश्पन्न झाले. त्यावरून पोलीसांनी अज्ञात आरोपी विरूध्द खुनाचा गुन्हा दाखल करून तापास मोहीम सुरू केली असून १३ दिवसात तपासणीला वेग असून  उपविभागीय अधिकारी रत्नाकर नवले हे तपासाची भूमिका पार पाडत असून यांनी महेबूब मदन चौधरी वय ३२ रा पसरणी याला १८ मे च्या रात्री १ वाजता अटक केली .या अटकेमुळे काही आरोपी सुद्धा आज  अटक होण्याची शक्यता आहे तपासाकरिता भगवान पायघन व पोलीस कर्मचारी करीत आहे.