शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

आजपासून पोषण महोत्सवास होणार प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:28 IST

वाशिम : राष्ट्रीय पोषण महिना दरवर्षी १ ते ३० सप्टेंबर या कालावधीत साजरा करण्यात येतो. यंदाही कोरोना नियंत्रणात असल्याने ...

वाशिम : राष्ट्रीय पोषण महिना दरवर्षी १ ते ३० सप्टेंबर या कालावधीत साजरा करण्यात येतो. यंदाही कोरोना नियंत्रणात असल्याने जिल्ह्यात १ सप्टेंबर रोजी पोषण महोत्सवास प्रारंभ होणार आहे.

प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक बोंद्रे व उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय जोल्हे यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात या महोत्सवाचे आयोजन व नियोजन करण्यात आले आहे. अंगणवाडी केंद्र, शाळा, ग्रामपंचायत, पंचायत समिती इत्यादी ठिकाणी सार्वजनिक जागांवर वृक्षारोपण करून पोषण वाटिका तयार करणे, परसबाग तयार करणे याबाबत जनजागृती करणे, गर्भवती महिलांसाठी पोषण आहाराबाबत घोषवाक्य तयार करण्यासाठी स्पर्धा घेणे, मातृत्व वंदन सप्ताह साजरा करणे तसेच सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये अंगणवाडी सेविकांचे १०० टक्के कोविड लसीकरण, गरोदर आणि स्तनदा महिलांसाठी कोविड लसीकरण, ॲनिमियामुक्त भारताच्या अनुषंगाने तपासणी व समुपदेशन, तिसऱ्या तिमाहीत गरोदर महिलांसाठी स्तनपानविषयक समुपदेशन, पोषण आहार व लोह याबाबत समुपदेशन तसेच अंगणवाडी केंद्रातील बालके आणि किशोरवयीन मुली यांचे आरोग्य पोषण यांच्या दृष्टीने योगाचे प्रशिक्षण नियोजन करण्यात आलेले आहे. कारंजा तालुक्यात उंबर्डाबाजार येथून या कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे. ३० सप्टेंबरपर्यंत गावस्तरावर अंगणवाडी स्तरावर उपकेंद्र स्तरावर आणि प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर नियोजनानुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनात कार्यक्रम घेण्यात येणार आहेत, असे बालविकास प्रकल्प अधिकारी मदन नायक यांनी सांगितले.

०००००००००००

कुपोषित बालकांची शोधमोहीम

सप्टेंबर महिन्याच्या चौथ्या आठवड्यामध्ये सॅम बालकांना शोधून पोषण आहाराचे वाटप करणे, कुपोषित बालकांची शोधमोहीम, संदर्भसेवा, वाडी वस्तीवरील तीव्र कुपोषित बालकांचा शोध घेणे व याबाबत जनजागृती करणे तसेच ‘माझे मूल, माझी जबाबदारी’ या अनुषंगाने कोविडसदृश लक्षणे असलेल्या बालकांची तपासणी केली जाणार आहे. सर्व केंद्रांवरील नियोजित कार्यक्रम हे कोरोनाचे नियम पाळून घेण्यात येतील, असे मदन नायक यांनी सांगितले.