शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थी संख्या घटली निम्म्याने!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 01:02 IST

जि.प. शाळांमधील वास्तव : इंग्रजी शाळांचा परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्क आसेगाव पो. स्टे. : आधुनिक शिक्षणाच्या नावाखाली शहरी भागासह आता ग्रामीण भागातही इंग्रजी व खासगी शाळांची संख्या भरमसाठ वाढत असून, त्याचा थेट परिणाम जिल्हा परिषद शाळांवर होत आहे. येथील जिल्हा परिषद शाळेत दोन वर्षांपूर्वी असलेली ३०० विद्यार्थीसंख्या घटून यंदा हा पट तब्बल १५६ पर्यंत उतरला आहे.ग्रामीण भागात ३ ते ६ वर्षे वयोगटातील मुले शासनाच्या एकात्मिक बाल व विकास योजनेंतर्गत चालविल्या जाणाऱ्या अंगणवाड्यांमध्ये शिक्षण घेतात. तसेच ६ वर्षे वयोगटापुढील विद्यार्थ्यांना पूर्वी जिल्हा परिषद शाळा हेच शिक्षणाचे मुख्य माध्यम होते. अंगणवाड्या आणि जिल्हा परिषद शाळा मोफत पाठ्यपुस्तके, पोषण आहार, गणवेष यासह विविध शिष्यवृत्ती योजना देऊ करीत असल्याने विद्यार्थ्यांसोबतच पालकांचेही समाधान होत असे; परंतु सध्या ग्रामीण भागातही इंग्रजी शिक्षणाचे वेड पसरले असून, लहान-लहान मुलांकडून पालकांच्या अवास्तव अपेक्षा वाढल्या आहेत. इंग्रजी शाळांमध्ये शिक्षण घेणे ही बाब प्रतिष्ठेची झाली असून, इंग्रजी शाळेत दोन वर्षांपासून शिक्षणासोबतच टापटिप राहण्याचे धडे दिले जातात. तथापि, परिसरातील बऱ्याच जिल्हा परिषद शाळा आता डिजिटल झाल्या असून, त्या ठिकाणी शिक्षक गुणवत्तापूर्ण शिक्षण देत आहेत; मात्र पालकांचा ओढा इंग्रजी शाळांकडेच अधिक असून, त्यांच्या मनातून इंग्रजी शाळांचे भूत काही केल्या उतरत नसल्याचे दिसून येत आहे. यामध्ये शासन शिक्षकांचेही प्रयत्न कमी पडत असून, यामुळेच जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या संख्येत प्रचंड प्रमाणात घट होत आहे. आसेगावपासून जवळच असलेल्या नांदगाव येथील जिल्हा परिषद शाळेबाबतही हाच प्रकार घडला असून, तेथे पूर्वी ७ वर्गतुकड्या होत्या. त्या आता मोडकळीस आल्या असून, वर्गखोल्या चार आणि पटसंख्या ३२ पर्यंत खालावली आहे.